Naval Dockyard Bharti 2024 : संरक्षण मंत्रालयाच्या (नेव्ही) अंतर्गत असणाऱ्या मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड स्कूल येथे भरती मोहीम आयोजित करण्यात आली आहे. विविध शिकाऊ पदांच्या भरतीसाठी ही अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून, उमेदवार https://registration.ind.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरू शकतात. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया १९ एप्रिलपासून सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १० मे असणार आहे. भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे व पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, अर्ज कसा करावा याबद्दल या लेखातून अधिक माहिती जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिक्त पदे आणि पदसंख्या –

इलेक्ट्रिशियन – ४०, इलेक्ट्रॉप लेटर – १, फिटर – ५०, फाउंड्री मॅन – १, मेकॅनिक – ३५, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – ७, मशीनिस्ट – १३, एमएमटीएम – १३, पेंटर (जनरल) – ९, पॅटर्न मेकर – १२, पाईप फिटर – १३, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – २६, मेकॅनिक आरईएफ आणि एसी – ७, वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) – १५, शीट मेटल वर्कर – ३, जहाजचालक (वुड) – १८, टेलर (जी) – ३ म्हणजेच एकूण ३०१ रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.

हेही वाचा…UPSC Recruitment 2024: यूपीएससी अंतर्गत ‘या’ ५०६ पदांसाठी भरती; अर्ज करण्यासाठी उरलेत काही दिवस

शैक्षणिक पात्रता –

  • आयटीआय ट्रेड्स (ITI Trades) – आयटीआय (एनसीव्हीटी / एससीव्हीटी)
  • नॉन आयटीआय ट्रेड्स
  • रिगर (Rigger) – आठवी पास
  • फोर्जर हीट ट्रीटर – एसएससी / मॅट्रिक / १० वी पास

वयोमर्यदा –

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान १४ वर्षे असावे.

भरतीसाठी अर्ज कसा करावा?

  • उमेदवारांनी https://registration.ind.in/ वर लॉगइन करून ऑनलाइन अर्ज भरायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना चांगल्या दर्जाची/वाचण्यायोग्य कागदपत्रे कलरमध्ये स्कॅन करणे गरजेचं आहे .
  • pdf फॉरमॅटमध्ये फक्त ४४ साईज आणि फाइल आकारात २०० केबीपर्यंत अपलोड करायचे आहे.

भरतीसाठी उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे थेट अर्ज करू शकतात…

लिंक – https://registration.ind.in/

उमेदवारांची निवड कशाप्रकारे होईल, यासाठी अधिसूचना एकदा वाचून घ्यावी…

Click to access AdvertisementIT26.pdf

सर्व अधिसूचना नीट वाचून मगच उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करावा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naval dockyard mumbai recruitment 301 vacancies for apprentice posts know all details for online application asp