नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड येथे काही पदाची भरती केली जाणार आहे. या भरतीअंतर्गत कनिष्ठ अभियंता, पर्यवेक्षक, वरिष्ठ लेखापाल, हिंदी अनुवादक आणि ड्राफ्ट्समन पदाच्या ३८८ जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वोयमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची माहिती जाणून घेऊया.

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन भरती २०२३ –

पदाचे नाव –

कनिष्ठ अभियंता, पर्यवेक्षक, वरिष्ठ लेखापाल, हिंदी अनुवादक आणि ड्राफ्ट्समन

एकूण रिक्त पदे – ३८८

शैक्षणिक पात्रता –

कनिष्ठ अभियंता – ६० टक्के गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी.

हेही वाटा- १२ वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी मदतनीस पदासाठी भरती सुरु

सुपरवाइजर –

६० टक्के गुणांसह पदवीधर + DOEACC ‘A’ कोर्स किंवा ६० टक्के गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/ IT डिप्लोमा किंवा BCA/ B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/ IT) + १ वर्ष अनुभव.

पर्यवेक्षक – ६० टक्के गुणांसह सर्वेक्षण/ सर्वेक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वरिष्ठ लेखापाल – Inter CA किंवा Inter CMA

हिंदी ट्रांसलेटर – इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी.

ड्राफ्ट्समन – संबंधित विषयात ITI ड्राफ्ट्समन.

वयोमर्यादा –

  • खुला प्रवर्ग – १८ ते ३० वर्षे.
  • ओबीसी – ३ वर्षांची सूट.
  • मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.

अर्ज फी –

  • खुला/ ओबीसी/ EWS – २९५ रुपये.
  • मागासवर्गीय/ PwBD/ माझी सैनिक यांना फी नाही.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतात कुठेही किंवा परदेशात.

महत्वाच्या तारखा:

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – ९ जून २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० जून २०२३

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1pcaIdqy6-EYgzNjcYHTAoNSIMWpLz8Gw/vie) या लिंकला अवश्य भेट द्या.