● इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ग्रॅज्युएट इंजिनीअर्सची इंजिनीअर्स/ऑफिसर्स (ग्रेड-ए) पदांची भरती.
(१) केमिकल इंजिनीअरिंग –
पात्रता – बी.ई./बी.टेक. (केमिकल/केमिकल अँड बायोकेमिकल/पेट्रोकेमिकल इंजिनीअरिंग किंवा अलाईड इंजिनीअरिंग पदवी.)
(२) इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग –
पात्रता – इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल अँड इन्स्ट्रूमेंटेशन/इलेक्ट्रिकल अँड कॉम्प्युटर इ. किंवा अलाईड इंजिनीअरिंग पदवी.
(३) इन्स्ट्रूमेंटेशन इंजिनीअरिंग –
पात्रता – इन्स्ट्रूमेंटेशन / इन्स्ट्रूमेंटेशन अँड कंट्रोल/इन्स्ट्रूमेंटेशन अँड इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रूमेंटेशन किंवा अलाईड इंजिनीअरिंग पदवी.
संबंधित बी.ई./बी.टेक. पदवीमध्ये ६५ टक्के गुण आवश्यक. (अजा/अज/अपंग उमेदवारांना ५५ टक्के गुण) (लेटर/नंबर ग्रेड दिलेले असल्यास परसेंटेज कन्व्हर्जन सर्टिफिकेट युनिव्हर्सिटीने दिलेले सादर करावे लागेल.)
पात्रता परीक्षेच्या अंतिम परीक्षेस बसलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. त्यांना परीक्षा दि. ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत उत्तीर्ण केल्याचा पुरावा सादर करावा लागेल.
वयोमर्यादा – ( १ जुलै २०२५ रोजी) २६ वर्षेपर्यंत. (वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, अपंग – १०/१३/१५ वर्षे)
वेतन – (वेतन श्रेणी रु. ५०,००० – १,६०,०००) अंदाजे रु. १७.७ लाख प्रतीवर्ष.
निवड पद्धती – ( i) कॉम्प्युटर बेस्ड् टेस्ट ( CBT) १०० ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न, वेळ १५० मिनिटे. सेक्शन-ए – डोमेन नॉलेज – ५० प्रश्न, सेक्शन-बी – जनरल अॅप्टिट्यूड -(क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड – २० प्रश्न, लॉजिकल रिझनिंग – १५ प्रश्न, व्हर्बल अॅबिलिटी ऑफ इंग्लिश लँग्वेज – १५ प्रश्न, एकूण ५० गुण, प्रत्येक प्रश्नास १ गुण.)
अजा/अजच्या उमेदवारांना CBT मध्ये पात्रतेसाठी प्रत्येक सेक्शनमध्ये किमान ३५टक्के गुण आवश्यक आणि सेक्शन-ए व सेक्शन-बी मिळून सरासरी ४०टक्के गुण आवश्यक. इतर उमेदवारांना प्रत्येक सेक्शनमध्ये किमान ४०टक्के गुण मिळविणे आवश्यक. तसेच दोन्ही सेक्शन मिळून सरासरी ४५टक्के गुण आवश्यक.
प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातील.
परीक्षा केंद्र – मुंबई एमएमआर, नागपूर, सूरत, हैद्राबाद, बंगलोर, भोपाळ इ. देशभरातील एकूण ४४ परीक्षा केंद्र. उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात ३ परीक्षा केंद्रांसाठी पसंतीक्रम द्यावयाचा आहे.
शंकासमाधानासाठी https:// cgrs. ibps. in या संकेतस्थळाला भेट द्या.
अॅडमिट कार्ड www. iocl. com या वेबसाईटवरून परीक्षेच्या १० दिवस अगोदर डाऊनलोड करता येतील.
अर्जाचे शुल्क – रु. ५००/- अधिक जीएसटी.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी www. iocl. com या संकेतस्थळावरील लिंक https:// iocl. com/ latest- job- opening मधून २१ सप्टेंबर २०२५ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत.
एलआयसी एचएफएल कंपनीत शिकाऊ भरती
● एलआयसी हाऊसिंग फिनान्स लिमिटेड (एलआयसी एचएफएल) मध्ये अॅप्रेंटिसशिप प्रोग्राम-००४ अंतर्गत फ्रेश पदवीधरांना ऑन जॉब ट्रेनिंग दरम्यान सॉफ्ट स्किल्स, डोमेन नॉलेज आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेवून नोकरी मिळविण्यास तयार करण्यात येईल.
एलआयसी एचएफएलमधील अॅप्रेंटिसशिप यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना बोर्ड ऑफ अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग ( BOAT) यांचेकडून प्रोफिशियन्सी सर्टिफिकेट दिले जाईल. त्यानंतर बँकींग फिनान्शियल सर्व्हिसेस अँड इन्श्युरन्स ( BFSI) सेक्टर स्किल काऊन्सिल ऑफ इंडिया यांचेकडून बँक्स, फिनान्शियल सर्व्हिसेस, इन्श्युरन्स कंपनी किंवा इतर BFSI सेक्टर कंपन्यांकडील प्लेसमेंट/नोकरीची संधीविषयी माहिती मिळू शकेल.
अॅप्रेंटिसशिपसाठीची एकूण रिक्त पदे – १९२.
दि. १ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होणाऱ्या अॅप्रेंटिसशिपचा कालावधी १२ महिने.
प्रशिक्षण भत्ता – उमेदवारांना अॅप्रेंटिसेससाठी दरमहा रु. १२,०००/- स्टायपेंड दिले जाईल.
पात्रता – उमेदवाराने १ सप्टेंबर २०२१ ते १ सप्टेंबर २०२५ दरम्यान पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा – (१ सप्टेंबर २०२५ रोजी) २० ते २५ वर्षे.
महाराष्ट्रातील रिक्त पदांचा तपशील – एकूण २५ पदे.
कल्याण – १ पद, मुंबई – ६, नवी मुंबई – १, पुणे – ८, ठाणे – १, नाशिक – ३ पदे, नागपूर – २, अहमदनगर – १, छ. संभाजी नगर – १, जळगाव – १.
एन्ट्रन्स एक्झामिनेशन फी – (१) रु. ९४४/- खुला प्रवर्ग/इमावसाठी, (२) रु. ७०८/- अजा/अज आणि महिलांसाठी, (३) रु. ४७२/- अपंग उमेदवारांसाठी.
एन्ट्रन्स एक्झामिनेशनमधील गुणवत्तेनुसार उमेदवार ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर २०२५ दरम्यान कागदपत्र पडताळणीसाठी आणि इंटरव्ह्यूकरिता एलआयसी एचएफएल कार्यालयात बोलाविले जातील.
अंतिम निवडलेले उमेदवारांना १५ ते २० ऑक्टोबर २०२५ दरम्यान ऑफर लेटर दिले जाईल.
NATS पोर्टलवर उमेदवारांना LICHFL अॅप्रेंटिसशिपसाठीची जाहिरात https:// nats. education. gov. in/ studenttype. php वर login करून पाहता येईल.
उमेदवारांनी https:// nats. education. gov. in/ studentsregister/ login या अॅप्रेंटिसशिप पोर्टलवर रजिस्टर करावे. उमेदवारांनी आपला login ID आणि password जपून ठेवावा. त्यानंतर रजिस्टर्ड उमेदवारांनी Enrollment ID घेवून ऑनलाइन अर्ज २२ सप्टेंबर २०२५ पर्यंत करावा.
शंकासमाधानासाठी info@bfsissc. com वर मेल करा.