सुहास पाटील

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-अ (अराजपत्रित) ते गट-ड मधील विविध २६ संवर्गातील पदांची सरळसेवा पद्धतीने भरती.

(पद भरती जाहिरात दि. ९ नोव्हेंबर २०२३ आणि शुद्धीपत्रक-१ दि. २२.११.२०२३, शुद्धीपत्रक-२ दि. २०.११.२०२३ शुद्धीपत्रक – ३ दि. ०६.१२.२०२४)

(१) फायरमन (गट-ड) – ३५ पदे (अजा – ५, अज – २, भज-ब – १, भज-ड – १, विमाप्र – १, इमाव – ७, आदुघ – ४, खुला – १४) (वेतन बँड – १५,००० – ४७,६००).

पात्रता : ( i) १० वी उत्तीर्ण, ( ii) राष्ट्रीय/ राज्य अग्निशमन केंद्र यांचा ६ महिने कालावधीचा अग्निशमन कोर्स पूर्ण, ( iii) मराठी भाषेचे ज्ञान.

(२) सुरक्षारक्षक (गट-ड) – ५ पदे (अजा – १, अज – १, विजा-अ – १, भज-क – १, इमाव – १) (वेतन बँड – १५,००० – ४७,६००).

पात्रता : ( i) १० वी उत्तीर्ण, ( ii) एन्.सी.सी. मधील ‘सी’ प्रमाणपत्र धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य.

पद क्र. १ व २ साठी किमान शारीरिक पात्रता : (अ) उंची – पुरुष – १६५ सें.मी., महिला – १५७ सें.मी. (ब) छाती – पुरुष – ८१-८६ सें.मी. (क) वजन – पुरुष – ५० कि.ग्रॅ., महिला – ४६ कि.ग्रॅ. (ड) दृष्टी – चांगली (विना चष्म्याने दृष्टी ६/६ तसेच Ishihara Chart नुसार रंगदृष्टी चांगली)

(३) पंप ऑपरेटर (गट-क) – २० पदे (अजा – १, अज – १, भज-ब – १, भज-क – १, भज-ड – १, विमाप्र – १, इमाव – ४, आदुघ – २, खुला – ८).

पात्रता : (अ) १० वी उत्तीर्ण, (ब) पंप ऑपरेटर या ट्रेडमधील आयटीआय कोर्स प्रमाणपत्र, (क) अनुभवधारकास प्राधान्य.

(४) पाईप व फिल्टर फिटर (गट-क) – १० पदे (अजा – १, अज – १, विजा-अ – १, भज-क – १, भज-ड – १, इमाव – २, आदुघ – १, खुला – २).

पात्रता : (अ) १० वी उत्तीर्ण, (ब) नळ कारागिर ट्रेडमधील आयटीआय कोर्स पूर्ण, (क) संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव, (ड) मराठी भाषेचे ज्ञान, (इ) अनुभवधारकास प्राधान्य.

हेही वाचा >>> यूपीएससीची तयारी: इतिहास विषयाची तयारी

(५) मिड वाईफ (गट-क) – ५० पदे (अजा – ३, अज – ४, विजा-अ – २, भज-ब – १, भज-ड – १, विमाप्र – १, इमाव – ७, आदुघ – ७, खुला – २४).

पात्रता : (अ) १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण, (ब) महाराष्ट्र नर्सिंग काऊन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवायफरी या विषयाची पदविका ( GNM), (क) रुग्णालयातील परिचारिका म्हणून ३ वर्षांचा अनुभव, (ड) महाराष्ट्र नर्सिंग काऊन्सिलची नोंदणी.

(६) कनिष्ठ श्रेणी लिपिक (गट-क) – ७ पदे (अज – १७, विजा-अ – ३, भज-ब – ८, भज-क – २, भज-ड – ७, इमाव – २९, आदुघ – ४) (७ पदे दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव).

पात्रता : (अ) पदवी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण, (ब) राज्य शासनाची मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि./ इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण, (क) टर- उकळ परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण, (ड) मराठी भाषेचे ज्ञान.

(७) अनुरेखक (ट्रेसर) (गट-क) – २ पदे (भज-ब – १, इमाव – १).

पात्रता : (अ) १० वी उत्तीर्ण, (ब) अनुरेखक व तत्सम समतूल्य ट्रेडमधील आयटीआय कोर्स उत्तीर्ण, (क) शासनमान्य संस्थेकडील ऑटोकॅड कोर्स पूर्ण, (ड) मराठी भाषेचे ज्ञान, (इ) अनुभवधारकास प्राधान्य.

(८) स्टेनो टायपिस्ट (गट-क) – २ पदे (विजा-अ – १, इमाव – १).

पात्रता : (अ) पदवी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण, (ब) राज्य शासनाची इंग्रजी किंवा मराठी लघुलेखनाची ८० श.प्र.मि. व ३० श.प्र.मि. वेगाची टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण, (क) टर- उकळ किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण.

(९) आरोग्य निरीक्षक (गट-क) – १० पदे (अज – ३, विजा-अ – १, भज-ड – १, इमाव – ४, खुला – १) (१ पद दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव).

पात्रता : (अ) १२ वी उत्तीर्ण, (ब) शासनमान्य आरोग्य निरीक्षक पदविका उत्तीर्ण, (क) शासनमान्य विद्यापीठाची पदवी विशेषत शास्त्र शाखेची पदवी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांस प्राधान्य.

(१०) प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ लॅब टेक्निशियन (गट-क) – २ पदे (अजा – १, विजा-अ – १).

पात्रता : (अ) रसायनशास्त्र/ सूक्ष्मजीवशास्त्र विषयातील पदवी, (ब) सूक्ष्मजीवशास्त्र/ रसायनशास्त्रमधील पदव्युत्तर पदवीधारकास प्राधान्य, (क) संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य.

हेही वाचा >>> १२ वी पास, डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी! HBCSE मुंबई अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरु

(११) कनिष्ठ अभियंता (विद्याुत विभाग) (गट-ब) – ५ पदे (भज-ब – १, इमाव – २, आदुघ – १, खुला – १).

पात्रता : (अ) विद्याुत अभियांत्रिकी शाखेची पदवी, (ब) अनुभवधारकास प्राधान्य, (क) मराठी भाषेचे ज्ञान.

आणि गट-अ मधील ३ पदे, गट-ब मधील ५ पदे व गट-क मधील ४ पदे यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वेबसाईटवरील जाहिरात पहावी.

वयोमर्यादा : फायरमन – ३२ वर्षे, इतर पदांसाठी खुला प्रवर्ग – १८ ते ४० वर्षे, मागासवर्गीय/ खेळाडू/ अनाथ – ४५ वर्षे, दिव्यांग/ प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त – ४७ वर्षे, अंशकालीन – ५७ वर्षे.

निवड पद्धती : परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेचे ठिकाण, दिनांक व वेळ ई-मेल किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येईल. तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल.

वरील सर्व पदांसाठी मौखिक परीक्षा घेतली जाणार नाही. फक्त कागदपत्र पडताळणी केली जाईल.

उमेदवारांची निवड निव्वळ गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. पात्रतेसाठी किमान खुला प्रवर्ग – ५० टक्के व मागासवर्गीय – ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक.

फायरमन व सुरक्षा रक्षक पदांकरिता मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी व विषयाशी संबंधित ६० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे १२० गुणांची वेळ १ तास ऑनलाइन परीक्षा व मैदानी क्षमता चाचणीसाठी ८० गुण असे एकूण २०० गुण. इतर सर्व पदांसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी व विषयाशी संबंधित १०० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे २०० गुणांची दोन तासांची ऑनलाइन परीक्षा.

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग – रु. १,०००/-, इतर सर्व प्रवर्गाकरिता रु. ९००/-.

ऑनलाइन अर्ज www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर दि. २० डिसेंबर २०२३ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत.

इंटेलिजन्स ब्युरो ( IB) (भारत सरकार, गृह मंत्रालय) असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड- II/ एक्झिक्युटिव्ह’ ( ACIO- II/ EXE) च्या एकूण ९९५ पदांची थेट भरती.

(१) (अजा – १३४, अज – १३३, इमाव – २२२, ईडब्ल्यूएस – १२९, खुला – ३७७).

पात्रता : पदवी उत्तीर्ण. इष्ट पात्रता – कॉम्प्युटरचे ज्ञान.

वयोमर्यादा : दि. १५ डिसेंबर २०२३ रोजी १८ ते २७ वर्षे. (विधवा/ परित्यक्ता/ कायद्याने विभक्त महिला – खुला – ३५ वर्षे, अजा/ अज – ४० वर्षे) (इमाव – ३० वर्षे, अजा/ अज – ३२ वर्षे, गुणवान खेळाडू – ३२ वर्षे), दिव्यांग उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत.

वेतन श्रेणी : लेव्हल-७ (रु. ४४,९००/- १,४२,०००/-) अंदाजे वेतन दरमहा रु. ८२,०००/- अधिक बेसिक पेच्या २० टक्के स्पेशल सिक्युरिटी अलाऊन्स. एकूण वेतन दरमहा रु. ९१,०००/-.

निवड पद्धती : Tier- I परीक्षा ऑब्जेक्टिव्ह टाईप १०० प्रश्न ५ पार्टमध्ये विभागलेले प्रत्येकी २० प्रश्न, प्रत्येक प्रश्नास १ गुण ((१) करंट अफेअर्स, (२) जनरल स्टडीज, (३) न्यूमरिकल अॅप्टिट्यूड, (४) रिझनिंग/ लॉजिकल अॅप्टिट्यूड), वेळ १ तास. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातील.

Tier- II – डिस्क्रीप्टीव्ह टाईप पेपर ५० गुणांसाठी. (निबंध – ३० गुण आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन आणि सारांश लेखन – २० गुण) वेळ १ तास.

Tier- III – इंटरव्ह्यू १०० गुणांसाठी (सायक्रोमेट्रिक/ अॅप्टिट्यूड टेस्टला सामोरे जावे लागेल.)

परीक्षा केंद्र : अमरावती, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई टटफ, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर. उमेदवारांनी ५ केंद्रांसाठी निवड द्यावयाची आहे.

परीक्षा शुल्क : रु. १००/- आणि रिक्रूटमेंट प्रोसेसिंग चार्जेस रु. ४५०/-. सर्व उमेदवारांनी रिक्रूटमेंट प्रोसेसिंग चार्जेस रु. ४५०/- भरणे आवश्यक. (खुला गट/ ईडब्ल्यूएस /इमावचे पुरुष उमेदवारांसाठी रु. ४५०/- रु. १००/-) (माजी सैनिक ज्यांनी आरक्षणाचा फायदा घेऊन केंद्र सरकारमधील नोकरी मिळविली आहे. त्यांना परीक्षा शुल्कातून सूट मिळणार नाही.)

विस्तृत जाहिरात www.mha.gov.in किंवा ncs portal www.ncs. gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्ज www.mha.gov.in या संकेतस्थळावर दि. १२ डिसेंबर २०२३ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solapur municipal corporation recruitment 2023 jobs in solapur municipal corporation zws