Success story: आयआयटी पदवीधर सध्या जगातील काही मोठ्या कंपन्यांचे नेतृत्व करत आहेत. आयआयटी पदवीधर त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी अथवा जास्त वेतनासाठी ओळखले जातात. बहुतेक IIT पदवीधर तर संस्थेने आयोजित केलेल्या ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ मधून उच्च पगाराच्या नोकऱ्या मिळवतात. प्रत्येक आयआयटी पदवीधरास नोकरी हवी असते. पण, असे काही उमेदवार असतात, ज्यांनी त्यांचे ध्येय आधीच वेगळे निश्चित केलेले असते आणि ते ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’मध्ये सहभागी होत नाहीत. अलीकडेच अशाच एका विद्यार्थ्याची प्रेरित गोष्ट समोर येत आहे. कल्पित वीरवाल असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. विद्यार्थ्याने जेईई मेनमध्ये ऑल इंडिया नंबर १ रँक मिळवला. त्यानंतर त्याने आयआयटी मुंबईमध्ये शिक्षण पूर्ण केले, पण स्वत:चे स्टार्टअप सुरू करण्यासाठी नोकरी नाकारली. चला तर या हुश्शार विद्यार्थ्याची यशोगाथा पाहूया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजस्थानमधील रहिवासी असलेल्या कल्पित वीरवालने जेईई मेन २०१७ मध्ये ३६० पैकी ३६० गुण मिळवून ऑल इंडिया नंबर १ रँक मिळवला. त्यानंतर त्याने देशातील पहिल्या क्रमांकाच्या कॉलेज, आयआयटीच्या बीटेक कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग कोर्समध्ये प्रवेश घेतला. त्याने २०१७ ते २०२१ या कालावधीत येथे इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. यादरम्यान आयआयटीमध्ये शिकणारा प्रत्येक विद्यार्थी प्लेसमेंट फेरीची वाट पाहत असतो. पण, कल्पित वीरवाल याने आयआयटी बॉम्बेमधील प्लेसमेंटमध्ये भाग घेतला नाही आणि स्वत:चे स्टार्टअप सुरू करण्याचे ध्येय ठेवले.

हेही वाचा…Success Story: कर्जाचा बोजा, शिपायाची नोकरी; वाचा एकेकाळी कारखान्याच्या तळघरात राहणाऱ्या ‘फेविकॉल मॅन’ची यशोगाथा

त्यामुळे जेव्हा प्लेसमेंट्स सुरू होणार होत्या, तेव्हा त्याने लिंक्डइनवर एका पोस्टमध्ये लिहिले, मला देशासाठी काहीतरी करायचे आहे. कल्पित वीरवाल याला देशात रोजगार निर्माण करायचा होता. त्यासाठी पहिलं पाऊल म्हणून त्याने २०१९ मध्ये त्याची ऑनलाइन एज्युटेक कंपनी AcadBoost Technologies सुरू केली. AcadBoost हे जेईई, NEET, फाउंडेशन आणि कॉलेजसाठी भारतातील सर्वोत्तम ऑनलाइन शिक्षण तयारीचे व्यासपीठ आहे. देवाच्या कृपेने आणि लोकांच्या पाठिंब्याने त्याची कंपनी सुरळीत चालू लागली. त्याच्या कंपनीतील ३० हून अधिक कामगार ६० हजारांहून अधिक शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शिक्षकांना सक्षम करण्याचे ध्येय ठेवू लागले.

तसेच पुढील दोन वर्षांत व्यवसाय स्थिर झाला. कंपनी सुरू झाल्यापासून त्याला चांगला नफा होत होता. पण, दरमहा विद्यार्थी संख्या वाढत असल्यामुळे त्याने सर्व पैसे विविध व्यवसाय, स्टॉक आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवले आहेत. जीईई मेन टॉपर होण्यापासून ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाडमध्ये नंबर-1 रँक मिळवण्यापर्यंत कल्पित वीरवालच्या नावावर अनेक गोष्टी आहेत. त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्याने नॅशनल टॅलेंट सर्च स्कॉलरशिप, इंडियन नॅशनल ॲस्ट्रोनॉमी ऑलिम्पियाड, तर स्वत:चे यूट्यूब चॅनेलही सुरू केले आहे,

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Student named kalpit veerwal all india no 1 rank jee toper left iit bombay and start his own startup read success story asp