Success Story Dr. Syed Sabahat Azim : प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट असतो; जो एखाद्या व्यक्तीपासून त्याची आवडती गोष्ट काढून घेतो, तर कधी कधी त्याला यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवतो. तर, अशा वेळी स्वतःला अपयशी न मानता, पुन्हा उभे राहण्यालाच महत्त्व आहे. तर, तुम्ही आयुष्यात तुम्ही एक वेळा पडला असाल, तर दुसऱ्या वेळेला उठून उभे राहा, असे सांगणारा माजी आयएएस अधिकारी डॉक्टर सय्यद सबाहत अझीम यांचा प्रवास (Success Story) आहे. माजी आयएएस अधिकारी डॉक्टर सय्यद सबाहत अझीम यांच्याबरोबर एक आयुष्य बदलून टाकणारी घटना घडली; जेव्हा त्यांच्या वडिलांचे कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेदरम्यान निधन झाले. या शोकांतिकेने अझीमला आयएएस अधिकाऱ्याचे पद सोडून उद्योजकतेचा पाठपुरावा करण्यास प्रवृत्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अझीम यांनी अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीचा (AMU) भाग असलेल्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज (JNMC) मधून वैद्यकीय पदवी घेतली. त्यानंतर ते प्रशासकीय सेवेत रुजू झाले आणि मग त्यांनी त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव माणिक सरकार यांच्यासह विविध पदांवर काम केले. पण, तरीही अझीम यांना अस्वस्थ वाटत होते. त्यांना एक माणूस म्हणून समाधान वाटेल असे काहीतरी करायचे होते. त्यामुळे नंतर त्यांनी ग्रामीण भारतामध्ये परवडणारी आरोग्य सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. आरोग्य सेवा पुरवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची दखल घेऊन, अझीम यांना वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या श्वाब फाउंडेशन फॉर सोशल एंटरप्रायझेसने २०२० चा सामाजिक उद्योजक म्हणून निवडले.

हेही वाचा…Success Story : शून्यातून शिखरापर्यंत…! कामगार ते स्वतःचा ब्रँड; वाचा पराठ्यांचा व्यवसाय सुरू करणाऱ्या दास यांचा प्रवास

गावात ३० खाटा टाकून सुरू केली आरोग्य सेवा :

उत्तर प्रदेशातून आलेल्या अझीम यांनी आपला बहुतांश वेळ ग्रामीण भारतातील सेवेदरम्यान घालवला. २०१० मध्ये हेल्थकेअर सिस्टीम (Glocal Healthcare Systems)ची स्थापना केली आणि एका गावात ३० खाटा टाकून, एक स्वस्त आरोग्य सेवा सुरू केली. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूने त्यांच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट म्हणून काम केले. कारण- त्यांच्या लक्षात आले की, जर त्यांच्या वडिलांवर वैद्यकीय सुविधा नसल्यामुळे अशी आपत्ती उद्भवू शकते, तर ती भारतातील कोणत्याही नागरिकाबरोबर होऊ शकते.

तेव्हापासून त्यांची हॉस्पिटलची साखळी लक्षणीयरीत्या विस्तारली आहे. बीरभूम, बांकुरा, मुर्शिदाबाद, बर्दवान, दार्जिलिंग व नादियासह पश्चिम बंगालच्या विविध जिल्ह्यांमध्ये त्यांचे हेल्थकेअर आहे, असे त्यांनी एका व्यावसायिक दैनिकाशी बोलताना, त्यांनी सांगितले होते. माणूस म्हणून आपल्या सर्वांच्या अनेक ओळखी आहेत. मग ते आपले राष्ट्रीयत्व असो किंवा वास्तविक… पण आपण कोण आहोत, आपण कोणासाठी काय करीत आहोत हे महत्त्वाचे आहे, असे या प्रवासातून (Success Story) आपल्याला दिसून आले.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story dr syed sabahat azim journey background and experiences led him to create glocal healthcare systems in 2010 asp