Success Story of IPS Akash Kulhari: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) सारख्या देशातील सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अनेक लोकांच्या यशोगाथा आपल्याला प्रेरणा देतात. तथापि, काही कहाण्या या खास असतात. आकाश कुल्हारी यांची कहाणीदेखील अशीच खास आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आकाश कुल्हारी शाळेत फारसे चांगले विद्यार्थी नव्हते आणि त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते. पण त्यांनी हार मानली नाही आणि कठोर परिश्रम केले. त्याचा परिणाम असा झाला की ते पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले. चला तर मग यानिमित्ताने आयपीएस आकाश कुल्हारी यांचा यशाचा प्रवास कसा होता ते जाणून घेऊया.

राजस्थानचे रहिवासी

रिपोर्ट्सनुसार, आकाश यांचा जन्म राजस्थानमधील बिकानेर येथे झाला. ते हुशार विद्यार्थी नव्हते आणि त्यांच्या अभ्यासात त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. याच कारणामुळे शाळेने त्यांना अकरावीत प्रवेश नाकारला कारण त्यांना दहावीत फक्त ५७ टक्के गुण मिळाले होते. त्यानंतर त्यांनी केंद्रीय विद्यालयात प्रवेश घेतला पण यावेळी त्यांनी खूप मेहनत घेतली आणि बारावीत ८५ टक्के गुण मिळवले.

एम.फिलच्या प्रवेशाने यूपीएससीची तयारी सुरू केली

आकाश कुल्हारी यांनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर बिकानेरच्या दुग्गल कॉलेजमधून बी.कॉम. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) येथून एम.ए. केले. त्याचे शिक्षण पूर्ण केले. पुढे, त्यांनी एम.फिल.ला प्रवेश घेतला आणि त्याच वेळी यूपीएससीची तयारी सुरू केली.

पहिल्या प्रयत्नात यश

उत्तर प्रदेश पोलिसांच्या अधिकृत वेबसाइट uppolice.gov.in नुसार, आकाश यांनी २००५ मध्ये UPSC परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात २७३ वा क्रमांक मिळवला. ते २००६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी झाले. सध्या ते उत्तर प्रदेश केडरचे अधिकारी आहेत आणि सध्या ते आयजी (सार्वजनिक तक्रार)/डीजीपी मुख्यालयात कार्यरत आहेत.


मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story of ips akash kulhari who cracked upsc in first attempt after expelled from school for less marks dvr