● आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी ( AWES) यांचेमार्फत चालविण्यात येणाऱ्या देशभरातील विविध कॅन्टॉन्मेंट्स आणि मिलिटरी स्टेशन्समधील एकूण १४० ‘आर्मी पब्लिक स्कूल’ ( APS) मध्ये शिक्षक पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन स्क्रीनिंग टेस्ट ( OST) २०, २१, २२, २३ सप्टेंबर २०२५ रोजी घेणार आहेत. APS मधील शिक्षक निवड प्रक्रियेत जेव्हा इंटरव्ह्यू/अध्यापन कौशल्य मूल्यमापन चाचणीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. तेव्हा शाळानिहाय रिक्त पदांचा तपशील जाहीर केला जाईल.
या परीक्षेतून पुढील पदांच्या भरतीसाठी उमेदवार पुढील भरती प्रक्रियेसाठी निवडले जातील. APS शाळा CBSE बोर्डाशी संलग्न आहेत.
महाराष्ट्रात असलेली आर्मी पब्लिक स्कूल्स – क्लस्टर-१ – ((१) APS, पुणे; (२) APS, खडकी; (३) APS, दिघी; (४) APS, देहू रोड; (५) APS, खडकवासला;) क्लस्टर-२ – ((६) APS, देवळाली; (७) APS, मुंबई; (८) APS, अहमदनगर; (९) APS, काम्टी (नागपूर); (१०) APS MIC S, अहमदनगर).
(१) पोस्ट ग्रॅज्युएट टीचर ( PGT) – पात्रता – किमान ५० टक्के गुणांसह ( i) संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी आणि ( ii) बी.एड्. उत्तीर्ण.
(२) ट्रेण्ड ग्रॅज्युएट टीचर ( TGT) – पात्रता – किमान ५० टक्के गुणांसह ( i) संबंधित विषयातील पदवी आणि ( ii) बी.एड्. उत्तीर्ण.
(३) प्रायमरी टीचर ( PRT) –
पात्रता – किमान ५० टक्के गुणांसह ( i) पदवी आणि ( ii) बी.एड्. किंवा इलेमेंटरी एज्युकेशनमधील दोन वर्षांचा डिप्लोमा उत्तीर्ण.
पात्रता परीक्षा नॅशनल काऊन्सिल ऑफ टिचर्स एज्युकेशन मान्यताप्राप्त संस्थेमधून प्राप्त केली असावी.
पदवीला ५० टक्के पेक्षा कमी गुण मिळालेले पदव्युत्तर पदवीधारक (ज्यांना पदव्युत्तर पदवीला सरासरी ५० टक्के पेक्षा किंवा अधिक गुण मिळाले असतील) असे उमेदवार TGT आणि PRT साठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
वयोमर्यादा – (नियुक्तीच्या वर्षी दि. १ एप्रिल रोजी) अनुभव नसलेले उमेदवार – ४० वर्षेपर्यंत; गेल्या १० वर्षांत ५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले उमेदवार ४० ते ५५ वर्षेपर्यंत.
निवड पद्धती – (ए) स्टेज-१ – वस्तुनिष्ठ ऑनलाइन स्क्रीनिंग टेस्ट. २०० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न, (बी) स्टेज-२ – इंटरह्यू
निवड प्रक्रिये संबंधी काही तक्रार असल्यास ती संबंधित कमांडचे मुख्यालयातील चेअरमन, बोर्ड ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन यांचेकडे करावे.
ऑनलाइन मॉक टेस्ट १ सप्टेंबर २०२५ पासून रजिस्ट्रेशन पोर्टल www. awesindia. com वर उपलब्ध करून दिली जाईल.
स्क्रीनिंग टेस्टसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन www. awesindia. com या पोर्टलवर १६ ऑगस्ट २०२५ (संध्याकाळी ५.०० वाजे)पर्यंत करता येईल.
हेल्पलाईन नंबर ७९६९०४९९४८.
ई-मेल awes25. helpdesk@smartexams. com
निवड प्रक्रियेच्या स्टेज-२ व स्टेज-३ मधील शंकासमाधानासाठी यांच्याशी संपर्क साधा ‘ The Chairman, Board of Administration, Army Welfare Society, HQ, Southern Command, Pune – ४११ ००१’.