Tata Memorial Centre Recruitment 2024: मुंबईकरांसाठी एक चांगली सुवर्णसंधी चालून आली आहे. टाटा मेमोरेरियल सेंटर आणि हॉस्पिटल येथे नोकरीची उत्तम संधी आहे. वैद्यकीय आणि बिगर वैद्यकीय कर्मचारी पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती मोहिमेद्वारे, TMC वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, महिला परिचारिका, सहाय्यक, तंत्रज्ञ स्टेनोग्राफर इत्यादी वैद्यकीय आणि गैर-वैद्यकीय कर्मचाऱ्यांची ८७ पदे भरली जाणार आहेत.नुकतीच याबाबत टाटा मेमोरियल सेंटर यांनी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून ७ मे २०२४ अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील या भरतीमधील पदे, पात्रता, वेतन याबाबतची सविस्तर माहिती पाहूया.

अर्जाची प्रक्रिया १७ एप्रिल २०२४ रोजी सुरू झाली आणि शेवटची तारीख ७ मे २०२४ असून इच्छूकांनी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

TMC वैद्यकीय आणि गैर-वैद्यकीय भरती 2024 : टाटा मेमोरेरियल सेंटर भरती अधिसूचना २०२४ वैद्यकीय आणि गैर-वैद्यकीय पदांसाठी ८७ रिक्त आहे.

रिक्त पदांची संख्या

वैद्यकीय अधिकारी – ०८

वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ – ०२

कार्यालयीन प्रभारी – ०१

वैज्ञानिक सहाय्यक – ०१

वैज्ञानिक अधिकारी – ०१

सहाय्यक नर्सिंग अधीक्षक – ०१

महिला परिचारिका – ५८

किचन पर्यवेक्षक – ०१

तंत्रज्ञ – ०५

स्टेनोग्राफर – ०६

निम्न विभाग लिपिक – ०३

एकूण – ८७

TMC शैक्षणिक पात्रता – वैद्यकीय आणि गैर-वैद्यकीय भरती 2024 साठी पात्रता निकष परीक्षा प्राधिकरणाने जारी केले आहेत. पात्रता निकषांचे तपशील जाणून घेण्यासाठी उमेदवार अधिकृत अधिसूचनेचा संदर्भ घेऊ शकतात. सर्व पदांसाठी विविध शैक्षणिक पात्रता देण्यात आल्या आहेत. तपशीलवार पात्रता जाणून घेण्यासाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना तपासू शकतात.

TMC Recruitment 2024 वेतन

मेडिकल फिजिसिस्ट – ५६,१००/-

लोअर डिव्हिजन क्लर्क – १९,९००/-

स्टेनोग्राफर – २५५००

महिला नर्स ‘ए’ – ४४,९००

टेक्निशियन ‘सी’ – २५५००

हेही वाचा >> NHPC Recruitment 2024 :कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा सरकारी नोकरी; ‘या’ पदांसाठी भरती सुरू; ३० एप्रिलपूर्वी करा अर्ज

नोकरी ठिकाण – मुंबई

वयोमर्यादा – ३० वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०७ मे २०२४

अधिकृत वेबसाईट – https://tmc.gov.in/

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tmc recruitment 2024 apply online for 87 medical and non medical posts check eligibility srk