Top Highest Paying Jobs In India For 2050 : भारतीय उद्योग क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी निर्माण होत आहेत. अनेक नव्या क्षेत्रांसह त्यात नव्या नोकऱ्या निर्माण होत आहेत. विशेषत: आयटी क्षेत्रात आपल्याला अनेक मोठे बदल पाहायला मिळत आहेत. याच उद्योग क्षेत्रासंदर्भात ‘फायनाशियल एक्स्प्रेस’ने एआयवर आधारित एक रिपोर्ट तयार केलाय. त्यात त्यांनी १९७५ ते २००० आणि पुढे २००० ते २०२४ दरम्यान भारतीय उद्योगातील करिअरच्या पर्यायांचे परीक्षण केले आहे. यावेळी भारतीय नोकऱ्यांच्या बाजारपेठेत दर २५ वर्षांनी लक्षणीय उलथापालथ होत असल्याचे त्यांना आढळले. तसेच आयटी क्षेत्र आणि उद्योगांमधील प्रगतीमुळे नव्या संधी निर्माण झाल्याचेही दिसून आले आहे.
भारतात २००० दरम्यान अनेक आयटी कंपन्या जन्माला आल्या. त्यामुळे सॉफ्टवेअर डेव्हलपर, नेटवर्क मॅनेजर, आयटी सपोर्ट स्पेशलिस्ट यांसारख्या नव्या नोकऱ्या निर्माण झाल्या; ज्यात होतकरू व्यक्तींसाठी करिअरच्या अनेक संधी निर्माण झाल्या.
२००० पर्यंत भारतातील आयटी उद्योग क्षेत्रात चांगल्या रीतीने परिपक्वता आली. त्यानंतर हे क्षेत्र २००० ते २०२४ पर्यंत विस्तारत गेले. विशेषतः पहिल्या दीड दशकात आयटी आणि तंत्रज्ञान सेवांच्या विस्ताराने वेगळा टप्पा गाठला.
गेल्या दशकात डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग (AIML) यांसारख्या क्षेत्रांत नवीन कल्पना व त्यातून होणारी उद्योगनिर्मिती आणि इतर गोष्टी पाहायला मिळाल्या.
२०२४ मध्ये डेटा सायन्स, रोबोटिक्स इंजिनियरिंग, मशीन लर्निंग व फिनटेक यांसारखी क्षेत्रे आधीच आघाडीवर आहेत. या क्षेत्रात सर्वाधिक नोकऱ्या आहेत. येत्या काही दशकांमध्ये हे क्षेत्र आणखी विकसित होत जाईल, अशी अपेक्षा आहे. या लेखातून तुम्हाला २०२५ पर्यंत भारतातील सर्वोच्च अशा उच्च पगाराच्या १० नोकऱ्या कोणत्या असतील आणि त्या पदांसाठी त्यांना किती पगार मिळू शकतो याचा अंदाज करण्यात आला आहे. त्यासाठी ChatGPT व Google चे जेमिनी या AI च्या दोन प्रमुख टूल्सची मदत घेण्यात आली आहे. त्यात त्यांनी भविष्यातील नोकऱ्यांच्या संधींविषयीही अंदाज वर्तवला आहे.
२०५० पर्यंत भारतात अपेक्षित असलेल्या अग्रक्रमावरील उच्च पगाराच्या १० नोकऱ्या आणि त्या नोकऱ्यांमधील भूमिकांचे अंदाज यांनुसार सरासरी पगार जाणून घेण्यासाठी AI आधारित चॅटबॉट्सचा सल्ला घेण्यात आला. त्यामुळे वाचकांना सूचित केले जाते की, या लेखात दिलेली माहिती ही AI चॅटबॉट्सवर आधारित आहे. ही माहिती कोणतेही औपचारिक संशोधन अहवाल किंवा तज्ज्ञांची मते यावर आधारलेली नाही. म्हणून या माहितीचा सावधगिरीने अर्थ लावला जावा, अशी शिफारस केली जात आहे.
२०५० पर्यंत भारतात ‘या’ क्षेत्रात असतील कोटींच्या पगाराच्या नोकऱ्या
ChatGPT नुसार २०५० पर्यंत भारतात अपेक्षित असलेल्या अग्रगण्य उच्च पगाराच्या १० नोकऱ्या आणि त्यांचे अंदाजित सरासरी पगार खालीलप्रमाणे :
१) आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (एआय) स्पेशलिस्ट– प्रतिवर्ष सरासरी पगार रु. ५० लाख ते एक कोटी रुपये
२) मशीन लर्निंग इंजिनीयर– प्रतिवर्ष सरासरी पगार ४५ लाख ते ९० लाख रुपये
३) रोबोटिक्स इंजिनीयर– प्रतिवर्ष सरासरी पगार ४० लाख ते ८० लाख रुपये
४) डेटा सायंटिस्ट – प्रतिवर्ष सरासरी पगार ३५ लाख ते ७५ लाख रुपये
५) क्वांटम कॉम्प्युटिंग अॅनालिस्ट – प्रतिवर्ष सरासरी पगार ४० लाख ते ८५ लाख रुपये
६) बायोटेक्नॉलॉजी रिसर्चर– प्रतिवर्ष सरासरी पगार ३० लाख ते ७० लाख रुपये
७) सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट – प्रतिवर्ष सरासरी पगार रु. ५० लाख ते रु. एक कोटी
८) फिनटेक स्पेशलिस्ट – प्रतिवर्ष सरासरी पगार ४० लाख ते ८५ लाख रुपये
९) स्पेस सायंटिस्ट/ इंजिनीयर – प्रतिवर्ष सरासरी पगार ४५ लाख ते ९० लाख रुपये
१०) सस्टेनेबल एनर्जी कन्सल्टंट – प्रतिवर्ष सरासरी पगार ३० लाख ते ६५ लाख रुपये.
हाच प्रश्न गूगल बेस एआय जेमिनीला विचारला असता, काय उत्तरे मिळाली ते पाहा.
१) आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि मशीन लर्निंग (ML) : प्रतिवर्ष अंदाजित सरासरी पगार रु. एक कोटी ते २.५ कोटी रुपये
२) रिन्यूएबल एनर्जी अॅण्ड सन्स्टेबिलिटी : प्रतिवर्ष सरासरी पगार रु. ५० लाख ते रु. १.५ कोटी
३) बायोटेक्नॉलॉजी अॅण्ड हेल्थकेअर : प्रतिवर्ष सरासरी पगार रु. ७५ लाख ते रु. २ कोटी
४) सायबर सिक्युरिटी : प्रतिवर्ष सरासरी पगार रु. ७५ लाख ते रु. २ कोटी
५) रोबोटिक्स अॅण्ड ऑटोमेशन : प्रतिवर्ष सरासरी पगार रु. ७५ लाख – रु. १.५ कोटी
६) क्लाउड कॉम्प्युटिंग : प्रतिवर्ष सरासरी पगार रु. ७५ लाख ते १.५ कोटी
७) डेटा सायन्स अॅण्ड ॲनालिटिक्स : प्रतिवर्ष सरासरी पगार रु. ७५ लाख ते रु. १.५ कोटी
८) क्वांटम कॉम्प्युटिंग : प्रतिवर्ष सरासरी पगार रु. एक कोटी ते २.५ कोटी
९) ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी : प्रतिवर्ष सरासरी पगार ७५ लाख ते १.५ कोटी
१०) नॅनो टेक्नॉलॉजी : प्रतिवर्ष सरासरी पगार ७५ लाख ते १.५ कोटी रुपये
(टीप – वाचकांनी लक्षात ठेवावे की, सादर केलेल्या नोकरीच्या भूमिका आणि पगाराचे अंदाज AI द्वारे काढण्यात आले आहेत. यात कोणताही औपचारिक संशोधन अहवाल किंवा तज्ज्ञांच्या विश्लेषणाचा आधार घेतलेला नाही.)
© IE Online Media Services (P) Ltd