Premium

केंद्रीय लोकसेवा आयोगांतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरु, कोण करु शकतं अर्ज जाणून घ्या

UPSC CGS Recruitment 2023: भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, महत्वाच्या तारखा आणि वयोमर्यादा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

UPSC CGS Recruitment 2023
केंद्रीय लोकसेवा आयोग. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

UPSC CGS Recruitment 2023: केंद्रीय लोकसेवा आयोगाने संयुक्त भू-वैज्ञानिक प्राथमिक परीक्षा २०२४ साठी ५६ पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०२३ आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संयुक्त भू-वैज्ञानिक परीक्षेसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, महत्वाच्या तारखा आणि वयोमर्यादा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकूण रिक्त पदे – ५६

परीक्षेचे नाव – संयुक्त भूवैज्ञानिक (जियो-सायंटिस्ट) पूर्व परीक्षा २०२४

पदाचे नाव व रिक्त पदे –

पदाचे नाव रिक्त पदे
जिओलॉजिस्ट – ग्रुप A३४
जिओफिजिसिस्ट – ग्रुप A
केमिस्ट – ग्रुप A १३
सायंटिस्ट B (हायड्रोलॉजी) – ग्रुप A
सायंटिस्ट ‘B’ (केमिकल) – ग्रुप A
सायंटिस्ट ‘B’ (जिओफिजिक्स) – ग्रुप A

शैक्षणिक पात्रता:

जिओलॉजिस्ट – जियोलॉजिकल सायन्स/ जियोलॉजी/ अप्लाइड जियोलॉजी/ जियो-एक्सप्लोरेशन/ मिनरल एक्सप्लोरेशन/ इंजिनिअरिंग जियोलॉजी/ मरीन जियोलॉजी/ अर्थ सायन्स आणि रिसोर्स मॅनेजमेंट/ ओशनोलॉजी आणि कोस्टल एरिया स्टडीज/ पेट्रोलियम जियोलॉसायन्स/ जियोकेमिस्ट्री विषयात पदव्युत्तर पदवी.

जिओफिजिसिस्ट – फिजिक्स/ अप्लाइड फिजिक्स/ जियोफिजिक्स/ मरीन जियोफिजिक्स विषयात पदव्युत्तर पदवी किंवा इंटरग्रेटेड M.Sc. (एक्सप्लोरेशन जियोफिजिक्स) किंवा अप्लाइड जियोफिजिक्स विषयात M.Sc. (Tech.)

केमिस्ट – केमिस्ट्री/ अप्लाइड केमिस्ट्री/ एनालिटिकल केमिस्ट्री विषयात पदव्युत्तर पदवी.

सायंटिस्ट ‘B’ (हायड्रोलॉजी) – जियोलॉजी/ अप्लाइड जियोलॉजी/ मरीन जियोलॉजी/ हायड्रोजियोलॉजी विषयात पदव्युत्तर पदवी.

सायंटिस्ट ‘B’ (केमिकल) – केमिस्ट्री/ अप्लाइड केमिस्ट्री/ एनालिटिकल केमिस्ट्री विषयात पदव्युत्तर पदवी.

सायंटिस्ट ‘B’ (जिओफिजिक्स) – फिजिक्स/ अप्लाइड फिजिक्स/ जियोफिजिक्स/ मरीन जियोफिजिक्स विषयात पदव्युत्तर पदवी किंवा इंटरग्रेटेड M.Sc. (एक्सप्लोरेशन जियोफिजिक्स) किंवा अप्लाइड जियोफिजिक्स विषयात M.Sc. (Tech.).

हेही वाचा- केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात नोकरीची मोठी संधी! ‘या’ पदांसाठी भरती सुरु, पदानुसार महिना ६० हजारांहून अधिक पगार मिळणार

वयोमर्यादा –

  • खुला प्रवर्ग – २१ ते ३२ वर्षे.
  • ओबीसी – ३ वर्षांची सूट
  • मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट

अर्ज फी –

  • खुला/ ओबीसी प्रवर्ग – २०० रुपये.
  • मागासवर्गीय/ महिला/ – फी नाही.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

अधिकृत बेवसाईट – https://upsc.gov.in/

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – २० सप्टेंबर २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० ऑक्टोबर २०२३

परीक्षेची तारीख –

पूर्व परीक्षा – १८ फेब्रुवारी २०२४
मुख्य परीक्षा – २२ जून २०२४

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1eLA4mqwO8rXalOhBs2I2j8KvRLmmgC4L/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Upsc cgs bharati 2023 recruitment for these posts under central public service commission know who can apply jap

First published on: 21-09-2023 at 17:58 IST
Next Story
UPSC-MPSC : भूस्खलन आणि हिमस्खलनाची नेमकी कारणे कोणती? भारतातील कोणत्या भागात सर्वाधिक घटना घडतात?