प्रश्न क्र. १ :

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?

१) सन १९१९ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय खिलाफत चळवळीचे अध्यक्ष म्हणून महात्मा गांधी यांची निवड झाली होती.

२) ‘रौलेट कायद्याविरुद्ध गांधींनी सत्याग्रह सुरू केला, त्यात भाग घेण्यासाठी मी हजर नव्हतो, एवढेच मला वाईट वाटते’, हे उद्गार लोकमान्य टिळकांचे आहे.

पर्याय :

अ) विधान १ बरोबर

ब) विधान २ बरोबर

क) विधान १ व २ बरोबर

ड) विधान १ व २ चूक

प्रश्न क्र. २ :

खालीलपकी कोणते विधान चूक आहे?

१) १२ मार्च १९३० रोजी महात्मा गांधीजींनी आपल्या ७५ सहकाऱ्यांसह साबरमती आश्रमापासून दांडीयात्रेस आरंभ केला. याच दिवसापासून सविनय कायदेभंगाचा लढा सुरू झाला.

२) सन १९१९-२० मध्ये सुरू करण्यात आलेली असहकाराची चळवळ महात्माजींनी मध्येच स्थगित केली. कारण की चौरीचौरा (उ.प्र.) येथील हिंसाचार त्यास कारणीभूत ठरला होता.

पर्याय :

अ) विधान १ चूक

ब) विधान २ चूक

क) विधान १ व २ चूक

ड) विधान १ व २ बरोबर

प्रश्न क्र. ३ :

२४ सप्टेंबर १९३२ रोजी महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झालेल्या पुणे कराराशी खालीलपकी कोणती बाब विसंगत आहे?

पर्याय :

अ) हरिजनांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची कल्पना त्याज्य ठरविली गेली.
ब) हरिजनांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मान्य करण्यात आले.
क) स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही हरिजनांना प्रतिनिधित्व दिले गेले.
ड) हरिजनांसाठी १४८ जागा राखीव ठेवण्यात आल्या.

प्रश्न क्र. ४

खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?

१) मार्च, १९४२ मध्ये क्रिप्स मिशन भारतात आले. त्यावेळी विन्स्टन चर्चिल इंग्लंडचे पंतप्रधान होते.

२) सप्टेंबर १९४६ रोजी राष्ट्रसभेने जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन केले.

पर्याय :

अ) विधान १ बरोबर

ब) विधान २ बरोबर

क) विधान १ व २ बरोबर

ड) विधान १ व २ चूक

प्रश्न क्र. ५ :

खालीलपकी कोणते विधान महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्यामध्ये २४-२५ सप्टेंबर १९३२ रोजी घडून आलेल्या पुणे करारासंदर्भात चुकीचे आहे?

पर्याय :

अ) हरिजनांसाठी स्वतंत्र मतदारसंघ असावेत; पण राखीव जागा नसाव्यात, असे मान्य करण्यात आले.

ब) हरिजनांसाठी राखीव असाव्यात; परंतु स्वतंत्र मतदारसंघ नसावेत, असे ठरविण्यात आले.

क) हा करार येरवडा येथील तुरुगांत घडून आल्याने तो येरवडा करार म्हणूनही ओळखला जातो.

ड) या करारान्वये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही हरिजनांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या.

प्रश्न क्र. ६ :

खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?

१) ‘गांधीजी म्हणजे एका माणसाचे सन्यच!’ गांधीजींविषयीचे हे गौरवोद्गार लॉर्ड माऊंटबॅटन यांचे आहेत.

२) भारताला जर आपल्या देशातील दारिद्रय़ व विषमता नष्ट करावयाची असेल तर त्यास समाजवादाची कास धरावी लागेल, हे विचार पंडित जवाहरलाल नेहरू यांचे आहेत.

पर्याय :

अ) विधान १ बरोबर

ब) विधान २ बरोबर

क) विधान १ व २ बरोबर

ड) विधान १ व २ चूक

प्रश्न क्र. ७

खालीलपकी कोणते विधान चूक आहे?

१ ) स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या १८५७ चे स्वातंत्र्यसमर या मराठी ग्रंथांचा इंग्रजी अनुवाद करण्याचे श्रेय शामजी कृष्ण वर्मा या विद्वान क्रांतिकारकाकडे जाते.

२) फ्रान्सच्या किनाऱ्यावर मास्रेलिस बंदराजवळ सावरकरांनी बोटीतून केलेल्या साहसी पण अयशस्वी पलायनाने सर्वत्र खळबळ माजली. ‘पेनिन्शुलर अँड ओरिएंट’ कंपनीच्या मालकीच्या या बोटीचे नाव एम.एम.मोरिआ. असे होते.

पर्याय :

अ) विधान १ चूक
ब) विधान २ चूक
क) विधान १ व २ चूक
ड) विधान १ व २ बरोबर

प्रश्न क्र. ८ :

खालीलपकी कोणत्या कायद्यान्वये केंद्र व प्रांत या दोन्ही स्तरांवर लोकसेवा आयोगाची रचना करण्याची तरतूद करण्यात आली होती?
पर्याय :

अ) पिट्स इंडिया अ‍ॅक्ट

ब) १९१९ चा सुधारणा कायदा

क) १९०९ चा सुधारणा कायदा

ड) १९३५ चा भारत सरकार कायदा

प्रश्न क्र. ९ :

सायमन कमिशन संदर्भात खाली काही विधानं केली आहेत. यांपैकी कोणतं विधान चुकीचं आहे?

१ ) सायमन कमिशनचा रिपोर्ट इ.स. १९२७ मध्ये जाहीर करण्यात आला.

२ ) भारतात या कमिशनविरूद्ध मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली.

३ ) सायमन कमिशनच्या शिफारसींवर चर्चा करण्यासाठी ब्रिटिश सरकारने तीन गोलमेज परिषदेचे आयोजन केले.

पर्याय :

अ) विधान १ चूक
ब) विधान १ आणि २ चूक
क) विधान २ चूक
ड) विधान २ आणि ३ चूक

या प्रश्नांची उत्तरं संध्याकाळी ८ वाजता लोकसत्ता.कॉमवर प्रसिद्ध होतील. वरील प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc history subject question set part 2 spb