Loksatta Test Series : सराव प्रश्न पुढील प्रमाणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रश्न क्र. १

पुढीलपैकी कोणता घटक वातावरणावर परिणाम करत नाही?

पर्यायी उत्तरे :

१ ) तापमान
२) पर्जन्य
३) मृदा
४) समुद्र प्रवाह

प्रश्न क्र. २

केनेली-हेवीसाईड लेयर पुढीलपैकी कोणत्या थरात आढळते?

पर्यायी उत्तरे :

१) तपांबर
२) स्थितांबर
३) आयनांबर
४) मध्यांबर

प्रश्न क्र. ३

ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतिकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली?

अ) किचकवध
ब) सुभद्राहरण
क) सौभद्र
ड) कट्यार काळजात घुसली

पर्यायी उत्तरे :

१) फक्त अ
२) अ आणि ब
३) क आणि ड
४) फक्त ब

प्रश्न क्र. ४

अरोरा बोरिओलीस ही घटना कोठे घडते?

पर्यायी उत्तरे :

१) विषुववृत्त
२) उत्तर ध्रुव
३) दक्षिण ध्रुव
४) तपांबर

प्रश्न क्र. ५

पृथ्वी हा ग्रह किती अंशाने झुकलेला किंवा कललेला आहे?

पर्यायी उत्तरे :

१) ३०°३०’
२) २३°३०’
३) ६६°३०’
४) ३५°३०’

प्रश्न क्र. ६

आंतर उष्णकटिबंधीय अभिसरण क्षेत्र (Inter tropical convergence zone) संकल्पना कोणी दिली?

पर्यायी उत्तरे :

१) एच फ्लोहन
२) एल डी स्टॅम्प
३) अल्फ्रेड व्हॅगनार
४) हेरोडीतस

प्रश्न क्र. ७

हॉर्स लटीट्यूड (Horse Latitude)कोणत्या पट्ट्याला म्हणतात?

पर्यायी उत्तरे :

१) ध्रुवीय उच्च दाबाचा पट्टा
२) उप उष्ण कटिबंधीय उच्च दाबाचा पट्टा
३) विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा
४) उप ध्रुवीय उच्च दाबाचा पट्टा

प्रश्न क्र. ८

पृथ्वीवर सूर्यकिरणे कोणत्या लहरी मध्ये प्राप्त होतात?

पर्यायी उत्तरे :

१) दीर्घ लहरी
२) क्ष-लहरी
३) लघु लहरी
४) वरीलपैकी एकही नाही

प्रश्न क्र. ९

खालीलपैकी कोणत्या निवडणुकांचे संचलन भारताच्या निवडणूक आयोगाकडून केले जात नाही?

पर्यायी उत्तरे :

अ) लोकसभा निवडणुका
ब) राज्यसभा निवडणूका
क) स्थानिक स्वशासन निवडणुका
ड) राष्ट्रपती निवडणूक

प्रश्न क्र. १०

कॅनरी हा थंड समुद्री प्रवाह खालीलपैकी कोणत्या महासागरात आढळतो?

पर्यायी उत्तरे :

१) दक्षिण अटलांटिक महासागर
२) प्रशांत महासागर
३) उत्तर अटलांटिक महासागर
४) हिंदी महासागर

प्रश्न क्र. ११

जगातील सर्वात खोल पॉईंट कोणता आहे?

पर्यायी उत्तरे :

१) जावा गर्ता
२) कुरील गर्ता
३) मरियाना गर्ता
४) पेरू गर्ता

प्रश्न क्र. १२

महाराष्ट्रातील व भारतीय क्रांतिकारकांना जपानकडून काय मिळाले?

पर्यायी उत्तरे :

१) प्रेरणा व बॉम्ब बनविण्याची प्रक्रिया
२) आर्थिक मदत व शस्त्रास्त्र रसद.
३) वरील दोन्ही
४) वरील एकही नाही.

प्रश्न क्र. १३

पृथ्वीचा अल्बेडो किती टक्के आहे?

पर्यायी उत्तरे :

१) ५१%
२) ३५%
३) १७%
४) १४%

प्रश्न क्र. १४

राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी ब्रिटीश सत्तेविरूद्ध महाराष्ट्रात सशस्त्र उठाव कोणी केले?

अ) चंद्रशेखर आझाद
ब) उमाजी नाईक
क) वासुदेव बळवंत फडके
ड) नानासाहेब पेशवे

पर्यायी उत्तरे :

१) ब आणि क
२) अ आणि ब
३) ब आणि ड
४) वरील सर्व

प्रश्न क्र. १५

राज्य लोकसेवा आयोगाच्या स्वातंत्र्याची खात्री देणाऱ्या तरतुदीबाबत कोणते विधान बरोबर नाही?

पर्यायी उत्तरे :

अ) अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती राज्यपाल करतात.
ब) त्यांच्या सेवाकाळात नुकसान कारक होईल अशा प्रकारे सेवा अटित बदल करता येत नाही.
क) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा कडून गैरवर्तनाची चौकशी होऊन आरोप सिद्ध झाल्याशिवाय पदमुक्त करता येत नाही.
ड) राज्यपाल दोषी असणाऱ्या ची सेवा तात्पुरती स्थगित करू शकतात परंतु बडतर्फीचे अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे.

प्रश्न क्र. १६

भिल्ल, कोळी आणि धनगर यांच्या शिवाय खालीलपैकी कोणती व्यक्ती वासुदेव बळवंत फडक्याना येऊन मिळाली?

अ) सिताराम गद्रे
ब) रामचंद्रपंत कुलकर्णी
क) गोपाळ मोरेश्‍वर साठे
ड)उमाजी नाईक

पर्यायी उत्तरे :

१) अ आणि क
२) ब आणि ड
३) अ आणि ड
४) अ, ब, क आणि ड

प्रश्न क्र. १७

खालीलपैकी कोणता उष्ण समुद्रीप्रवाह आहे?

पर्यायी उत्तरे :

१) क्यूरूशीओ समुद्री प्रवाह
२) ओयाशीओ समुद्री प्रवाह
३) लॅब्रेडोर समुद्री प्रवाह
४) बेंग्यूला समुद्री प्रवाह

प्रश्न क्र. १८

पृथ्वीवर ऊर्जा अधिशेष कोणत्या अक्षांशा दरम्यान बघायला मिळतो?

पर्यायी उत्तरे :

१) ३०° उत्तर ते ४०° दक्षिण
२) २३.५° उत्तर ते २३.५° दक्षिण
३) ४०° उत्तर ते ४०° दक्षिण
४) २०° उत्तर ते २०° दक्षिण

वरील प्रश्नांची उत्तरं पुढील प्रमाणे :

प्रश्न क्र. १- ३
प्रश्न क्र. २- ३
प्रश्न क्र. ३- १
प्रश्न क्र. ४- २
प्रश्न क्र. ५- २
प्रश्न क्र. ६- १
प्रश्न क्र. ७- २
प्रश्न क्र. ८- ३
प्रश्न क्र. ९- ३
प्रश्न क्र. १०-३
प्रश्न क्र. ११-३
प्रश्न क्र. १२- १
प्रश्न क्र. १३- २
प्रश्न क्र. १४- १
प्रश्न क्र. १५- ३
प्रश्न क्र. १६- ४
प्रश्न क्र. १७- १
प्रश्न क्र. १८ -४

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc loksatta test series polity geography history evs ecomics question set 15 spb