इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या ऑनलाइन शॉपिंगचे प्रस्थ प्रचंड प्रमाणात वाढत आहे. बसल्याजागी शेकडो प्रकारच्या वस्तूंमधून हवी ती वस्तू निवडण्याची सोय, दुकानांतील किमतीपेक्षा कमी दर आणि विविध सवलती यांमुळे भारतात ‘ई-कॉमर्स’ झपाटय़ाने फोफावत चालले आहे. नुकत्याच संपलेल्या दिवाळीत अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील अशा ई-कॉमर्स संकेतस्थळांच्या वृत्तपत्रांमध्ये झळकणाऱ्या पानपानभर जाहिराती पाहिल्यानंतर आपल्याला याची कल्पना आली असेलच. ग्राहकांतील मोठा तरुणवर्ग आता दुकानांत जाऊन खरेदी करण्यापेक्षा ऑनलाइन शॉपिंगला पसंती देऊ लागला आहे. यामागे अनेक कारणे असली तरी त्यातील महत्त्वाचे कारण हे घरबसल्या या वस्तू खरेदी करता येण्याची सुविधा, हे सर्वात मुख्य कारण आहे. केवळ इलेक्ट्रॉनिक वस्तूच नव्हे तर फर्निचरपासून भांडय़ांपर्यंत आणि किराणा मालापासून भाजीपाल्यापर्यंतची प्रत्येक गोष्ट आता ‘ऑनलाइन’ खरेदी करणे शक्य झाले आहे. यापैकी ऑनलाइन भाजीखरेदीची सुविधा पुरवणाऱ्या अॅपबद्दल आपण पाहणार आहोत.
ऑनलाइन शॉपिंगचा जोर वाढत असला तरी आजही अनेकांच्या मनात त्याच्याबद्दल एकप्रकारचा अविश्वास असतो. विशेषत: किराणा माल
बिग बास्केट
बिग बास्केट हे भाजीपाल्यासोबत किराणा मालाच्या खरेदीसाठीही उपयुक्त अॅप आहे. भारतातील प्रमुख शहरांत कार्यान्वित असलेले हे अॅप महाराष्ट्रात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमध्ये सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत १० लाख ग्राहकांनी या अॅपच्या माध्यमातून खरेदी केल्याचा कंपनीचा दावा आहे. ऑर्डर केलेले सामान ९० मिनिटांच्या आत तुमच्या दारात पोहोचवण्याची हमी ‘बिग बास्केट’ देते. याशिवाय ‘डिलिव्हरी’ला विलंब झाल्यास दहा टक्के सवलत देण्याचेही ‘बिग बास्केट’ने जाहीर केले आहे. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही नेटबँकिंग, कार्ड, कॅश ऑन डिलिव्हरी, सोडेक्सो पास या पर्यायांखेरीज पेटीएम, मोबीक्वीक अशा ‘वॉलेट’ अॅपचा वापर करून खरेदी करू शकता.
नेचर बास्केट
‘बिग बास्केट’प्रमाणेच गोदरेजचे नेचर बास्केट हे अॅप भाजी, फळे, सौंदर्यप्रसाधने व किराणा माल ऑर्डर करण्यासाठी उपयुक्त आहे. या अॅपवरही रोजच्या रोज वस्तू व भाजीपाल्याच्या किमती बदलत असतात तसेच त्यावर विविध सवलतीही जाहीर केल्या जातात. याशिवाय अॅपवरून खरेदी करणाऱ्यांसाठी ‘कॅशबॅक’ तसेच अन्य सवलतीही जाहीर करण्यात येतात. भारतातील १९० शहरांमध्ये ‘नेचर बास्केट’ची सेवा कार्यरत आहे.
asif.bagwan@expressindia.com
असिफ बागवान