काँग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या वक्तव्यावर खरमरीत पत्राद्वारे टीका केल्यानंतर आता काँग्रेस आणि भाजपातील शाब्दिक वादाला धार आली आहे. यावेळी डॉ. मनमोहन सिंग यांना थेट भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“पंतप्रधानांनी बोलताना काळजी घेतली पाहिजे. आपल्या शब्दांचा वापर चीनला भारताचं समर्थन म्हणून वापरण्याची संधी पंतप्रधानांनी देऊ नये. नियंत्रण रेषेवरील समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारने सर्व पर्याय वापरावेत तसंच ते चिघळू नयेत यासाठीही प्रयत्न करणं गरजेचं आहे,” असं डॉ. मनमोहन सिंग यांनी पत्रात म्हटलं होतं.

त्यांच्या पत्रानंतर भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांनी काही टि्वट करून काँग्रेस आणि डॉ. मनमोहन सिंग यांनी उत्तर दिलंय. नड्डा म्हणाले, “४३ हजार किमी भारतीय भूमी चीनला बहाल करणाऱ्या काँग्रेस पक्षाचेच डॉ. मनमोहन सिंग हे नेते आहेत. यूपीएच्या काळात कोणतंही युद्ध न होता आपला भूभाग गमावला. सातत्यानं आपल्या सैन्य दलांचा अपमान केला गेला.”

आणखी वाचा- मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावर मनमोहन सिंग यांची टीका, म्हणाले चीनला होऊ नये फायदा

जेपी नड्डा आपल्या दुसऱ्या टि्वटमध्ये म्हणाले की, “प्रिय डॉ. सिंग आणि काँग्रेस पार्टी, कृपया आपल्या सैन्यदलांच्या शौर्यावर प्रश्न उपस्थित करणं थांबवा. त्यांचा अपमान करू नका. हेच तुम्ही सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइकनंतरही केलं होतं. कृपया राष्ट्रीय एकात्मतेचा अर्थ संमजून घ्या. किमान या काळात तरी तो समजून घ्यायला हवा. अजूनही सुधारायला उशीर झालेला नाही.”

आणखी वाचा- “सॅटेलाइट फोटोत चीनने आपल्या जमिनीचा ताबा घेतल्याचं स्पष्ट दिसतंय”; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ

भाजपाध्यक्षांना काँग्रेसचं प्रत्युत्तर
भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांना काँग्रेसनंही प्रत्युत्तर दिलं. काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले की, भाजपा आणि जेपी नड्डा यांनी आता राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात तडजोड करणं थांबवाव.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp jp nadda reply on manmohan singh statement pm modi china galwan valley pkd
First published on: 22-06-2020 at 13:39 IST