Odisha Train Accident: ओडिशातल्या बालासोर या ठिकाणी झालेल्या अपघातामुळे संपूर्ण देश हादरला. या घटनेत २८८ प्रवासी ठार झाले आहेत. तर १ हजारपेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेला अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितलं की या दुर्घटनेतील अद्याप १०१ मृतदेहांची ओळख पटणं बाकी आहे. रेल्वे प्रबंधक रिंकेश रॉय यांनी सांगितलं ओडिशातल्या विविध रुग्णालयांमध्ये २०० प्रवाशांवर उपचार सुरु आहेत अशी माहिती पूर्व मध्य रेल्व मंडळाचे प्रबंधक रिंकेश रॉय यांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ओडिशा राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये लोकांवर उपचार सुरु आहेत. १०१ मृतदेहांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. बालासोरमध्ये झालेल्या दुर्घटनेत तीन ट्रेन एकमेकांवर आदळल्या होत्या. त्यामध्ये एक मालगाडी तर दोन प्रवासी वाहतूक करणाऱ्या एक्स्प्रेस होत्या. ही घटना बालासोरमध्ये घडली. त्यानंतर ५१ तास रुळावरचे मालगाडीचे आणि रेल्वेचे डबे हटवण्यात गेले. या घटनेमुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे.

भुवनेश्वरचे आयुक्त विजय कुलंगे यांनी ANI ला सांगितलं की भुवनेश्वरमध्ये १९३ मृतदेह होते. त्यापैकी ८० मृतदेहांची ओळख पटली आहे. ५५ मृतदेह हे कुटुंबीयांना देण्यात आले आहेत. मृतदेहांची ओळख पटवून त्यानंतर ते नातेवाईकांना दिले जात आहेत. शालीमार चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस ट्रॅकवर उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. त्यामुळे या ट्रेनचे डबे घरसरले. यानंतर यशवंतपूरहून हावडा या ठिकाणी जाणारी हावडा एक्स्प्रेसही या डब्यांवर आदळली आणि ट्रॅकवरुन उतरली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला. ज्या दिवशी अपघात झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळाचा दौरा केला होता आणि रुग्णालयांमध्ये जाऊन जखमींची विचारपूसही केली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 101 dead bodies not yet identified in odisha train accident scj