पीटीआय, भोपाळ
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध निवडणूक लढवत असलेल्या आपल्या ३९ नेत्यांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व प्रदेश काँग्रेसने रद्द केले आहे. प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्या निर्देशांवरून या ३९ नेत्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आल्याचे मध्य प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजीव सिंह यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
बडतर्फ करण्यात आलेले हे नेते एकतर अपक्ष उमेदवार म्हणून, किंवा बसप, सप आणि आम आदमी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढत आहेत, असे यात नमूद केले आहे.हकालपट्टीची कारवाई करण्यात आलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये माजी खासदार प्रेमचंद गुड्डू (आलोट), अंतर सिंह दरबार (महू)आदींचा समावेश आहे.