देशाचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचं २६ डिसेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास निधन झालं. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशाच्या प्रगतीत आणि अर्थिक विकासात डॉ.मनमोहन सिंग यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात त्यांनी दूरदृष्टीने अनेक योजना सुरू केल्या, त्याचा थेट फायदा सामान्य नागरिकांना झाला आहे. त्यामुळे त्यांच्या निधनामुळे अवघ्या देशावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनावर काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
काँग्रेसच्या अधिकृत एक्स खात्यावरून या भावना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. सोनिया गांधी म्हणतात, “डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनाने आपण एक असा नेता गमावला आहे जो हुशार, कुलीनपणाचा आणि नम्रतेचा प्रतिक होता. त्यांनी आपल्या देशाची मनापासून सेवा केली. काँग्रेस पक्षासाठी एक तेजस्वी आणि प्रिय मार्गदर्शक होते. त्यांची करुणा आणि दृष्टीने त्यांनी कोट्यवधी भारतीयांचे जीवन बदलले आणि सशक्त केले.”
मनमोहन सिंग यांच्यामुळे भारताला अभिमान आणि सन्मान मिळाला
“ते मनापासून भारतातील लोकांवर प्रेम करत होते. त्यांचे सल्ले आणि विचार आपल्या देशातील राजकीय विकासात प्रभावित ठरले. जगभरातील नेते आणि विद्वानांनी त्यांचा आदर आणि कौतुक केले, ते प्रचंड शहाणपण आणि उंचीचे राजकारणी म्हणून गौरवले गेले. डॉ. मनमोहन सिंग यांनी त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक उच्च पदावर तेज आणि वेगळेपणा आणला. यामुळे भारताला अभिमान आणि सन्मान मिळाला”, असंही सोनिया गांधी म्हणाले.
मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक
“माझ्यासाठी डॉ.मनमोहन सिंग यांचे निधन हे एक अतिशय वैयक्तिक नुकसान आहे. ते माझे मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक होते. ते खूप सौम्य होते. सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही मूल्यांप्रती त्यांची बांधिलकी खोल आणि अतूट होती. त्यांच्याबरोबर वेळ घालवायचा म्हणजे त्यांच्या ज्ञानाने आणि बुद्धिमत्तेने प्रबुद्ध होऊन, त्यांच्या प्रामाणिकपणाने आणि सचोटीने प्रेरित होऊन आणि त्यांच्या अस्सल नम्रतेने विस्मित होत असे”, असे कौतुद्गारही त्यांनी काढले.
???????? ????????????? ????? ??????????? ???. ????? ?????? ??'? ??????? ?? ??? ??????? ?? ?? ???????? ????? ??.
— Congress (@INCIndia) December 27, 2024
In Dr Manmohan Singh's passing, we have lost a leader who was the epitome… pic.twitter.com/3rE8I8u8TE
“त्यांनी आपल्या राष्ट्रीय जीवनात अशी पोकळी सोडली आहे जी कधीही भरून निघणार नाही. आम्ही काँग्रेस पक्षात आहोत आणि भारतातील जनतेला सदैव अभिमान आणि कृतज्ञता राहील की आम्हाला डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारखा नेता लाभला ज्यांचे भारताच्या प्रगती आणि विकासात योगदान अतुलनीय आहे”, असं सोनिया गांधी म्हणाल्या.
© IE Online Media Services (P) Ltd