वसईतील २६ वर्षीय श्रद्धा वालकर या तरुणीच्या खूनाने देश हादरला होता. तिचा प्रियकर आफताब अमिन पूनावाला याने श्रद्धाचा गळा दाबून खून केला होता. त्यानंतर श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले होते. हे तुकडे आफताबन तीन आठवडे रोज एक-एक करून मेहरोलीच्या जंगलात फेकत होता. तब्बल सहा महिन्याने ही घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रद्धाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर आफताबला दिल्लीतील मेहरोली पोलिसांनी अटक केली होती. आता आफातबच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे होत आहे. श्रद्धाच्या हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी आणि पोलिसांना चकमा देण्याकरता आफताबने क्राइम सीरिज आणि चित्रपट पाहिले होते. मोबाईल आणि लॅपटॉपवर तो असे चित्रपट पाहत होता, अशी माहिती समोर आली होती.

हेही वाचा : ‘अंगात भगवे वस्त्र आणि कपाळावर भस्म’, हिंदू संघटनेने छापलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पोस्टर चर्चेत!

त्यात श्रद्धाचा खून केल्यावर आफताब कायद्याचे दाव-पेच जाणून घेण्यासाठी हॉलीवूडचा एका खटला जाणून घेत होता. तो प्रसिद्ध खटला आहे, अभिनेता जॉनी डेप आणि त्याची आधीची पत्नी अँबर हर्ड यांच्यातील मानहानीचा. पोलिसांनी आफताबच्या इंटरनेटची हिस्टरी ( इतिहास ) पूर्ण पाहिल्यानंतर ही गोष्ट समोर आली. आफताबने जॉनी डेप आणि अँबर हर्ड यांचा मानहानीचा खटला अनेकवेळा वाचला होता. तसेच, त्यांची न्यायालयात सुरु असलेली सुनावणीही त्याने लाइव्ह पाहिली होती. तब्बल १०० तास हा मानहानीचा खटला आफताबने पाहिला होता.

काय आहे जॉनी डेप आणि अँबर हर्ड खटला?

२०१८ मध्ये ‘वॉशिग्टन पोस्ट’मधील एका लेखात हर्डने डेपवर गंभीर आरोप केले. आपण कौटुंबिक हिंसाचाराने पीडित असून जॉनीने आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप या लेखात करण्यात आला. हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर जॉनी डेपने अँबरने माझी बदनामी केल्याचा आरोप करून तिच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आणि पाच कोटी डॉलरची मागणी केली.

हेही वाचा : “मला जिवंत पकडणं तुम्हाला शक्य नाही,” मास्टरमाइंड गोल्डी ब्रारचं थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान, व्हिडीओ व्हायरल

त्याविरोधात अँबरनेही शारीरिक हिंसा आणि छळाचा दावा करत १० कोटी डॉलरची मागणी केली. गेल्या सहा आठवडे हा खटला चालला. त्यात अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले आहेत. ज्युरींच्या सात सदस्यांनी गेल्या तीन दिवसांत तासन् तास चर्चा केली. अखेर न्यायालयाने डेपची बाजू योग्य असल्याचे सांगत हर्डला १.५ कोटी डॉलरची भरपाई देण्याचे आदेश दिले. त्याशिवाय न्यायालयाने डेपलाही दंड सुनावला आहे. हर्डच्या काही मानहानीसाठी तो दोषी आढळला असून त्याला २० लाख डॉलरची भरपाई देण्यास सांगण्यात आले होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaftab poonawala watched hours of johnny depp amber heard trial after shradhha walker murder case ssa
First published on: 06-12-2022 at 19:52 IST