दिल्लीतील कथित उत्पादन शुल्क घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आप नेते मनीष सिसोदिया यांना अटक केल्यानंतर आपकडून देशभरात आंदोलनं केली जात आहेत. दरम्यान, याप्रकरणावरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्र सोडलं आहे. इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींनीही सर्व मर्यादा ओलांडल्या असल्याचे ते म्हणाले. बुधवारी दिल्लीत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – गॅस सिलिंडरची दरवाढ,घरगुती ५० रुपये, व्यावसायिक ३५० रुपयांनी महागले; ईशान्येकडील मतदान संपताच भाववाढ

काय म्हणाले अरविंद केजरीवाल?

“एकेकाळी इंदिरा गांधी यांनी अती करत सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. आज पंतप्रधान मोदीदेखील तेच करत आहेत. मोदींनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत आणि जेव्हा एखादा व्यक्ती मर्यादा ओलांडतो, तेव्हा त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतात, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली. तसेच मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांची अटक ही एकप्रकारे छळवणूक करण्याचा प्रकार आहे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – विरोध ठाकरेंना नव्हे, महाविकास आघाडीला,शिंदे गटाचा घटनापीठासमोर दावा; सुनावणीचा आज अखेरचा दिवस

“…तर सिसोदिया उद्या बाहेर येतील”

“मनीष सिसोदिया यांनी शिक्षण क्षेत्रात उत्तम काम केलं आहे. तसेच सत्येंद्र जैन यांनीही आरोग्य क्षेत्रात भरीव काम केलं आहे. मात्र, भाजपाला हे आवडलेलं नाही. त्यामुळे दोघांनीही अटक करण्यात आली”, असा आरोप केजरीवाल यांनी केला. तसेच “सिसोदिया आणि जैन जर आज भाजपात गेले, उद्या त्यांच्यावरील सर्व खटले रद्द होतील आणि त्यांची सुटका होईल. मुळात भ्रष्टाचार हा मुद्दा नाही, तर तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांना त्रास देणं हा मोदी सरकारचा उद्देश आहे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – ‘इस्लामिक स्टेट’च्या सात जणांना फाशीची शिक्षा,‘एनआयए’ न्यायालयाचा निर्णय; दहशतवादी कारवाया, रेल्वे स्फोटांत दोषी

सिसोदियांची खाती आतिशी यांच्याकडे

दरम्यान, सिसोदिया यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडील सर्व खाती, आप नेत्या आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांच्याकडे देण्यात आली असल्याची माहितीही केजरीवाल यांनी दिली. तसेच दोघेही लवकरच पदभार स्वीकारतील असेही ते म्हणाले. सिसोदिया आणि जैन ज्या वेगाने काम करत होते, त्यापेक्षा दुप्पट वेगाने हे दोघे काम करतील, असा विश्वासही केजरीवाल यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvind kejariwal compaire pm narendra modi with indira gandhi after manish sisodia arrest in delhi excise scam spb