महाराष्ट्राला वारीची परंपरा लाभली आहे. पंढरपूरला पायी जाण्याची परंपरा शतकानुशतके सुरू आहे. मात्र, करोनामुळे यामध्ये बाधा आली. मात्र हा सोहळा महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरम्यान आज आषाढी एकादशी असून आजच्या दिवशी सर्व पालख्या पंढरपुरात दाखल होतात. या आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत शुभेच्छा दिल्या आहेत.

मोदी यांनी सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे, अशी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थणा केली, नरेंद्र मोदी म्हणाले, “आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांना उदंड आनंद आणि चांगले आरोग्य लाभू दे, अशी विठ्ठलाचरणी प्रार्थना करुया. वारकरी चळवळ ही आपल्या उत्कृष्ट परंपरेचं उदाहरण असून समानता आणि एकता यावर भर देणारी आहे”

हेही वाचा- ‘..ज्याचे मुखी नाम तोचि धन्य’

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा

अखंड महाराष्ट्राचं अराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूरच्या विठुरायाचरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक नतमस्तक झाले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या गाभाऱ्यात शासकीय महापूजा पार पडली. करोनाचं संकट गडद होण्याची भीती असल्याने सरकारने यंदाही पायी वारीला परवानगी नाकारली होती; मात्र प्रतिनिधीक स्वरूपात मानाच्या दहा दिंड्यांना परवानगी देण्यात आली होती. पुष्पांनी सजलेल्या शिवशाही बसेसमधून संतांच्या पालख्या भूवैकुंठी दाखल झाल्या होत्या.