उदयपूर हत्या प्रकरण : 'सगळीकडे तणावाचे वातावरण, मोदी, अमित शाहांनी देशाला संबोधित करावं,' राज्यस्थानच्या मुख्यमंत्र्यांची विनंती | ashok gehlot demands narendra modi to address nation amid udaipur mudrer | Loksatta

उदयपूर हत्या प्रकरण : ‘सगळीकडे तणावाचे वातावरण; मोदी, अमित शाहांनी देशाला संबोधित करावं,’ राज्यस्थानच्या मुख्यमंत्र्यांची विनंती

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्या शिवणकाम व्यावसायिकाची राजसथामधील उदयपूर येथे हत्या करण्यात आली.

उदयपूर हत्या प्रकरण : ‘सगळीकडे तणावाचे वातावरण; मोदी, अमित शाहांनी देशाला संबोधित करावं,’ राज्यस्थानच्या मुख्यमंत्र्यांची विनंती
अशोक गेहलोत आणि नरेंद्र मोदी

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्या शिवणकाम व्यावसायिकाची राजसथामधील उदयपूर येथे हत्या करण्यात आली. या हत्येनंतर देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे. त्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ही घटना खूप गंभीर असून सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहन केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी जनतेला संबोधित करुन शांतता राखण्याचे आवाहन करावे, असे गहलोत म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> Maharashtra Political Crisis: “उद्या मुंबईत येतोय, बहुमत चाचणीला हजर राहणार”; कामाख्या मंदिरातून एकनाथ शिंदेंची घोषणा

“ही लज्जास्पद आणि दुखद घटना आहे. सध्या येथे तणावाचे वातावरण आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह देशाला संबोधित का करत नाहीयेत. मोदी यांनी देशाला संबोधित करावं आणि अशा प्रकारच्या हिंसेला खपवून घेतले जाणार नाही. सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहन करावे,” अशी मागणी गेहलोत यांनी मोदी आणि अमित शाह यांना केली.

हेही वाचा >>> उदयपूर हत्या प्रकरणावर राहुल गांधींची प्रतिक्रिया, म्हणाले ‘धर्माच्या नावावर…’

तसेच, “ही घटना खूपच गंभीर आहे. आमच्या कल्पनेच्या पलीकडीची ही घटना आहे. या घटनेतील गुन्हेगारास कठोर शिक्षा दिली जाईल,” असे आश्वासन गेहलोत यांनी जनतेला दिले.

दरम्यान, या घटनेचे पडसाद उमटत असताना काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. “उदयपूरमध्ये जी निर्घृण हत्या झाली त्यामुळे मला धक्का बसला आहे. धर्माच्या नावावर सुरु असलेली क्रूरता खपवून घेतली जाणार नाही. दहशत पसरविणाऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. आपल्या सर्वांना सोबत येऊन द्वेषाचा पराभव करायचा आहे. सर्वांनी शांतता आणि बंधुभाव राखावा, असे माझे आवाहन आहे,” असे राहुल गांधी म्हणाले आहेत.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा >>> सरकारी योजनांची जबाबदारी लवकरच सहकारी बँकांवर; केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची घोषणा

उदयपूरमध्ये नेमकं काय घडलं?

राजस्थानमधील उदयपूर येथे एका शिवणकाम व्यावसायिकाची मंगळावारी (२८ जून) हत्या करण्यात आली. त्याच्या दुकानात घुसून हल्लेखोरांनी त्याच्यावर तलवारीने वार केले आणि या हल्ल्याची चित्रफीत बनवून समाजमाध्यमांवर प्रसारित केली. त्यामुळे उदयपूरमध्ये तणाव निर्माण झाला असून या हत्येच्या निषेधार्थ स्थानिकांनी आंदोलन केले जात आहे. कन्हैयालाल तेली असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांचे उदयपूरमधील धनमंडी येथे कपडे शिवण्याचे दुकान आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Maharashtra Political Crisis: “उद्या मुंबईत येतोय, बहुमत चाचणीला हजर राहणार”; कामाख्या मंदिरातून एकनाथ शिंदेंची घोषणा

संबंधित बातम्या

“हिंमत असेल तर श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधा”, आफताबचं पोलिसांना खुलं आव्हान, खूनाचं कारणही सांगितलं
दिल्ली पालिकेत ‘आप’ची सत्ता; भाजपची १५ वर्षांची राजवट संपुष्टात, काँग्रेस आणखी क्षीण
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन ‘कर्णाटक बँके’तून!
“देशातील सर्वात छोट्या पक्षाने जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाला हरवलं”, आपचा भाजपाला खोचक टोला
नोटाबंदीसंबंधी कागदपत्रे सादर करा!; केंद्र सरकार, रिझव्‍‌र्ह बँकेला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

व्हिडिओ

ताज्या बातम्या
चीनमध्ये जनआंदोलनानंतर करोना निर्बंध शिथिल 
तृतीयपंथीयांना नोकरीची संधी डावलता येणार नाही; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
नेत्यांकडे स्वत:ची मते, व्यासंग असावा – देवेंद्र फडणवीस
गोवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी हाफकीन तयार
Maharashtra Karnataka border: एसटीच्या ३८२ फेऱ्या अंशत: रद्द