"भाजपा खासदार सनी देओल बेपत्ता आहे" लोकांनी शहरभर लावले पोस्टर, नेमकं काय घडलं? | BJP MP sunny deol missing poster pasted at walls railway station panjab pathankot rmm 97 | Loksatta

“सनी देओल बेपत्ता आहे” लोकांनी शहरभर लावले पोस्टर, नेमकं काय घडलं?

पंजाबमधील पठाणकोट जिल्ह्यात काही नागरिकांनी बॉलिवूड अभिनेता आणि भाजपा खासदार सनी देओल हरवला असल्याचे पोस्टर शहरभर लावले आहेत.

“सनी देओल बेपत्ता आहे” लोकांनी शहरभर लावले पोस्टर, नेमकं काय घडलं?
फोटो सौजन्य- एएनआय

पंजाबमधील पठाणकोट जिल्ह्यात काही नागरिकांनी बॉलिवूड अभिनेता आणि भाजपा खासदार सनी देओल हरवला असल्याचे पोस्टर शहरभर लावले आहेत. घरांच्या भिंती, रेल्वे स्थानक आणि वाहनांवर हे पोस्टर्स चिटकवले आहेत. त्यामुळे शहरभर एकच चर्चा सुरू आहे. भाजपा खासदार सनी देओल लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर आपल्या मतदारसंघात फिरकलेच नाहीत, त्यामुळे स्थानिक लोकांनी खासदाराविरोधात रोष व्यक्त केला आहे.

सनी देओल हे पंजाबमधील गुरदासपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा खासदार आहेत. लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर ते लोकांना कधी भेटलेच नाहीत. शिवाय ते कधीही आपल्या मतदारसंघात गेले नाहीत. त्यामुळे स्थानिक नागरिक संतापले आहेत. स्थानिक नागरिकांमध्ये सनी देओलबद्दल प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे लोक शहरभर सनी देओल बेपत्ता असल्याचे पोस्टर लावून संताप व्यक्त करत आहेत.

वंदे भारत एक्स्प्रेसचं ‘नाक’ तुटलं, पीएम मोदींनी उद्घाटन केल्यानंतर सहाव्या दिवशीच अपघात

खासदारावर नाराज असलेल्या एका स्थानिक तरुणाने सांगितलं, “जर त्यांना काम करायचं नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. खासदार झाल्यानंतर ते कधीही गुरुदासपूरला आले नाहीत. ते स्वतःला पंजाबचे सुपुत्र म्हणवतात पण त्यांनी कोणताही औद्योगिक विकास केला नाही. खासदार निधीचे वाटप केले नाही. केंद्र सरकारची कोणतीही योजना येथे आणलेली नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विश्लेषण : २०२० या एका वर्षात सात कोटी लोक गरिबीच्या गर्तेत ढकलले गेले; जागतिक बँकेची आकडेवारी, पण कारण काय ठरलं?

संबंधित बातम्या

“हिंमत असेल तर श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधा”, आफताबचं पोलिसांना खुलं आव्हान, खूनाचं कारणही सांगितलं
दिल्ली पालिकेत ‘आप’ची सत्ता; भाजपची १५ वर्षांची राजवट संपुष्टात, काँग्रेस आणखी क्षीण
“देशातील सर्वात छोट्या पक्षाने जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाला हरवलं”, आपचा भाजपाला खोचक टोला
नोटाबंदीसंबंधी कागदपत्रे सादर करा!; केंद्र सरकार, रिझव्‍‌र्ह बँकेला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
तालिबानने ताबा घेतल्यापासून अफगाणिस्तानमध्ये प्रथमच जाहीर फाशी

व्हिडिओ

ताज्या बातम्या
चीनमध्ये जनआंदोलनानंतर करोना निर्बंध शिथिल 
तृतीयपंथीयांना नोकरीची संधी डावलता येणार नाही; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
नेत्यांकडे स्वत:ची मते, व्यासंग असावा – देवेंद्र फडणवीस
गोवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी हाफकीन तयार
Maharashtra Karnataka border: एसटीच्या ३८२ फेऱ्या अंशत: रद्द