BJP vs Congress Bank Balance : भारतीय जनता पक्षाचे बँक बॅलेन्सचा विचार केला तर पक्षाच्या बँक खात्यात ७,११३.८० कोटी रुपयांची रक्कम आहे. तर दुसरीकडे देशातील सर्वात मोठ्या पक्षांपैकी एक काँग्रेसचे बँक बॅलेन्स ८५७.१५ कोटी रुपये इतके आहे. ही आकडेवारी ३१ मार्च २०२४ पर्यंतची असून पीटीआयने निवडणूक आयोगाच्या हवाल्याने यासंबंधीचे वृ्त्त दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०२३-२४ मध्ये भारतीय जनता पक्षाकडून १,७५४.०६ कोटी रुपये खर्च करण्यात आले. याच काळात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. दरम्यान ही रक्कम २०२२-२३ मध्ये खर्च केलेल्या १,०९२ कोटी रूपयांपेक्षा ६० टक्क्यांनी जास्त आहे.

तर दुसरीकडे काँग्रेसने २०२२-२३ मध्ये 192.56 कोटींच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये ६१९.६७ कोटी रुपये खर्च केले . लोकसभा निवडणुकीची घोषणा १६ मार्च २०२४ रोजी झाली होती.

निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या वार्षिक ऑडिटमध्ये भाजपाने दिलेल्या माहितीनुसार पक्षाला २०२३-२४ मध्ये सध्या बंदी असलेल्या इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून १,६८५.६९ कोटी रुपयांची देणगी मिळाली. या आधीच्या वर्षी मिळालेल्या देणग्या या १२९४.१५ कोटी रुपयांच्या होत्या.

सध्या केंद्रात सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाला वर्ष भरात २,०४२ कोटी रूपयांच्या इतर देणग्या देखील मिळाल्या, ज्या २०२२-२३ मध्ये ६४८.४२ कोटी इतक्या होत्या.

निवडणूक आयोगाला सादर केलेल्या वार्षिक ऑडिटमध्ये काँग्रेसने २०२३-२४ मध्ये एकूण १,२२५.११ कोटींच्या देणग्या मिळाल्याचे सांगितले आहे. यामध्ये इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून मिळालेल्या ८२८.३६ कोटी रूपयांचादेखील समावेश आहे .

भाजपाने जाहिरातींवर किती खर्च केला?

वर्षभरात भाजपने जाहिरातींवर ५९१ कोटी खर्च केले, ज्यात ४३४.८४ कोटी रुपये हे इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि ११५.६२ कोटी रुपये हे प्रिंटेट म साहित्यावर खर्च करण्यात आले. भाजपा पक्षाने २०२३-२४ या वर्षात विमान/हेलिकॉप्टरवर १७४ कोटी खर्च केले, २०२२-२३ मध्ये ही रक्कम ७८.२३ कोटी रुपये होती.

भाजपाने २०२४ मध्ये सभा आयोजनासाठी ८४.३२ कोटी रुपये खर्च केले आणि २०२३-२४ मध्ये मोर्चा, रॅली, आंदोलने इत्यादींचे आयोजन आणि कॉल सेंटरवर करण्यात आलेला खर्च ७५.१४ कोटी खर्च करण्यात आले होते.

काँग्रेसचा जाहिरातींवर किती खर्च?

दुसरीकडे काँग्रेसने २०२३-२४ मध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियावर २०७.९४ आणि प्रिंट केलेल्या साहित्यावर ४३.७३ कोटी रुपये खर्च केले अशी माहिती निवडणूक आयोगाच्या डेटामधून समोर आली आहे.

काँग्रेसने २०२३-२४ मध्ये विमान/हेलिकॉप्टरवर ६२.६५ कोटी खर्च केले आणि आपल्या उमेदवारांना २३८. ५५ कोटींची आर्थिक मदत दिली.

पक्षाने आपल्या ऑडिट रिपोर्टमध्ये २०२३-२४ या कालावधीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा २ वर ४९.६३ कोटी खर्च केल्याचेही सांगण्यात आले आहे, तर काँग्रेस पक्षाने २०२२-२३ मध्ये कन्याकुमारी ते काश्मीर दरम्यान काढलेल्या भारत जोडो यात्रेवर ७१.८४ कोटी खर्च केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp vs congress which political party has bigger bank balance ec data expense on advertisement rak