BJP Worker takes back biscuit packet after photo Viral Video : राजस्थानची राजधानी जयपूर येथील RUHSCMS रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या सेवा पंधरवाडा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. याचे कारण म्हणजे या आयोजनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या रुग्णालयात सेवा पंधरवाड्याअंतर्गत रुग्णांना फळ आणि बिस्किट वाटले जात होते, पण यादरम्यान एका भाजपाची महिला कार्यकर्तीने केलेली कृती या संपूर्ण कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.
नेमकं काय झालं?
या व्हायरल व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की ही महिला कार्यकर्ता एका रुग्णाला ५ ते १० रुपयांचे एक बिस्किटचा पुडा देतानाचा फोटो काढून घेतेला आणि फोटो काढल्याबरोबरत तो बिस्किटाचा पुडा परत घेऊन पिशवीत ठेवून निघून जाते. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या सेवा पंधरवाड्याचे आयोजन स्थानिक वॉर्ड संयोजक वीरेंद्र सिंह यांनी केले होते. यादरम्यान भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णांना फळे आणि बिस्किटे वाटली. मात्र या महिला कार्यकर्तीने बिस्किट परत घेतल्याने याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
सोशल मीडियावर टीका
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोक यावर टीका करत आहेत. अनेकांचे म्हणणे आहे की, गरीब आणि आजारी असलेल्या लोकांचा फक्त फोटो काढून घेण्यासाठी वापर करण्यात आला. तर अनेकांनी हा मार्केटिंग स्टंट असल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म दिवस १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी यांची जयंती पर्यंत भाजपाने सेवा पंधरवाडा साजरा करण्याची घोषणा केली होती. भाजपाने जाहीर केले होते की पंतप्रधान मोदींचा जन्मदिन ते महात्मा गांधी यांची जयंती या कालावधीत केंद्र सरकार आणि राज्य सराकर एकत्र येऊन कल्याणकारी आणि जागरुकता पसरवणे यासंबंधीत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. सेवा पंधरवाडा या कालावधित देशात अनेक ठिकाणी स्वच्छता आणि जागरूकता यासंबंधी कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले.