देशात मोदी सरकार आहे आणि विरोधकांना म्हणजेच इंडिया आघाडीला वेध लागले आहेत ते २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे. या आघाडीच्या तीन बैठका पार पडल्या आहेत. आता रॅलीज आणि प्रचारसभाही सुरू होतील. अशात काँग्रेसने ईडीचा मुद्दा उचलून धरत मोदी सरकारवर एका गाण्याच्या माध्यमातून टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेसने ट्विट केलेल्या या व्हिडीओत काय आहे?

सौदागर या सिनेमात एक गाणं आहे इलू इलू नावाचं.. त्याची चाल घेऊन काँग्रेसने ईडी ईडी क्या है? ये ईडी ईडी? अशा ओळी रचत गाणं तयार केलं आहे. या गाण्यात काही लोक मस्त तयार होतात, त्यांच्या हातात मै ईडी हूँ हा बोर्ड असतो. त्यानंतर गरीबांवर ते कशा धाडी मारत फिरतात ते दाखवण्यात आलं आहे. त्यानंतर शेवटी ओळी येतात ईडी का मतलब मोदीजी, ईडी का मतलब अदाणीजी, ईडी का मतलब बीजेपी. हे सांगत असताना ज्यांच्यावर धाडी मारल्या आहेत ते सगळे गरीब लोक या लोकांना मारतात असा आशय असलेला हा व्हिडीओ आहे. विनोदी ढंगाने हे गाणं तयार करुन सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

देशात मोदी सरकार आल्यापासून ईडी आणि सीबीआय यांच्या धाडी वाढल्या आहेत अशी टीका या सरकारवर कायमच केली गेली आहे. ईडी, सीबीआय आणि शासकीय यंत्रणांचा वापर करून भाजपाचं सरकार ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी अस्वस्थता, अराजक निर्माण करायचं. तिथे फोडाफोडी करायची आणि मग भाजपाचं राज्य आणायचं असे आरोप विरोधक भाजपावर करत आले आहेत. त्या अनुषंगानेच आता काँग्रेसने ईडी ईडी क्या है हे गाणं तयार केलं आहे. काँग्रेसने प्रचाराच्या उद्देशानेच हे गाणं आणि हा व्हिडीओ आणला आहे. आता भाजपाकडून याला कसं उत्तर दिलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress post new song against modi and bjp ed ed kya hai which is viral on social media scj