बुधवारी दिल्ली महापालिकेत महापौरपदासाठी निवडणूक पार पडल्यानंतर स्थायी समितीच्या सदस्यांची निवड होणार होती. मात्र, या निवडीवरून मोठा गदारोळ झाल्याचं बघायला मिळालं. यावेळी आम आदमी पक्ष आणि भाजपाच्या नगरसेवकांनी ऐकमेकांना धक्काबुक्कीही केली. तसेच काही नगरसेवकांनी ऐकमेकांवर पाण्याच्या बाटल्याही फेकल्या. त्यामुळे काल रात्री उशीरा सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – दिल्लीत अखेर ‘आप’चा महापौर; शेली ओबेरॉय यांचा ३४ मतांनी विजय

नेमकं काय घडलं?

स्थायी समितीतील सदस्यांच्या निवडीसाठी गुप्तमतदान पार पडणार होते. मात्र, यावेळी काही नगरसेवकांनी आपल्या मोबाईद्वारे मतपत्रिकेचा फोटो काढल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला. यावरून भाजपा आणि आपचे नगरसेवक ऐकमेकांना भिडले. यावेळी दोन्ही पक्षांतील नगरसेवकांनी ऐकमेकांवर पाण्याच्या बाटल्या फेकल्या. तसेच जोरदार घोषणाबाजीही केली. रात्री उशीरापर्यंत हा गोंधळ सुरू होता.

यासंदर्भात बोलताना आप नेते सौरभ भारद्वाज म्हणाले, भाजपाला स्थायी समितीची निवडणूक स्थगित करायची आहे. त्यामुळे ते जाणीवपूर्वक गदारोळ करत आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आम्ही कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक घेऊ. तर, ‘आप’ला क्राँस वोटींगची भीती असल्यानेच गदारोळ केला जात असल्याचा आरोप भाजपा नेते शेहजाद पूनावाला यांनी केला आहे.

हेही वाचा – Delhi Mayor Election : दिल्लीच्या महापौरपदी ‘आप’च्या शैली ओबेरॉय; भाजपाच्या रेखा गुप्ता यांचा ३४ मतांनी पराभव

दरम्यान, तत्पूर्वी महापौरपदाच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या उमेदवार शैली ओबेरॉय विजयी झाल्या. त्यांनी भाजपा उमेदवार रेखा गुप्ता यांचा ३४ मतांनी पराभव केला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi mayor election clash at mcd house aap bjp councillors throw boxes and water bottles spb