Trump-Putin Meeting : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यातील बैठक अलस्काच्या अँकोरेज येथील जॉइंट बेस एल्मेनडॉर्फ-रिचर्डसन येथे झाली. या भेटीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधल्याचे पाहायला मिळाले. जेव्हा पुतिन येथे दाखल झाले तेव्हा आखाशात अमेरिकेच्या हवाई दलाने त्यांच्या खास शैलीत त्यांचे स्वागत केले. यावेळी बी-२ स्पिरिट स्टेल्थ बॉम्बर आणि फायटर जेट्स त्यांच्या डोक्यावरून गेल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पुतिन यांनी मान वर करत आकाशाकडे पाहले, या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काही जणांच्या मते हे फक्त एक स्वागत नव्हते थर पुथिन यांना अमेरिकन सैन्याची शक्ती दाखवून देण्यासाठीचा हा प्रयत्न होता. बी-२ हे विमान गुंतागुंतीच्या अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणालीमध्ये घुसण्यासाठी आणि एकदम अचूक लक्ष्यभेद करण्यासाठी ओळखले जाते. जून महिन्यात अमेरिकेने हेच विमान वापरून इराणच्या अणु केंद्रांना लक्ष्य केले होते.
दरम्यान २२ सेकंदांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये पुतिन आणि ट्रम्प हे रेड कार्पेटवरून एका स्टेजकडे चालत येताना दिसत आहेत, यावेळी अचानक बी-२ बॉम्बर आणि फाटर जेट्स हे त्यांच्या डोक्यावरून उडत जाताना दिसले. यावेळी पुतिन यांनी वर मान करत त्या विमानांकडे पाहिल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. याच्या माध्यमातून एकप्रकारे रशियासोबतच्या चर्चेपूर्वी अमेरिकेने शक्ती आणि लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन घडवून आणल्याचे दिसून आले.
Trump just flew a B-2 stealth bomber over Putin’s head…
— Geiger Capital (@Geiger_Capital) August 15, 2025
Absolutely incredible. pic.twitter.com/2bsnssRv9f
बी-२ बॉम्बरमध्ये काय खास आहे?
अमेरिकेच्या या बी-२ विमानांची किंमत प्रत्येकी सुमारे २.१ अब्ज डॉलर्स इतकी प्रचंड आहे. हे विमान आतापर्यंतचे सर्वात महागडे लष्करी विमान ठरले आहे. Northrop Grumman यांनी तयार केलेल हे बॉम्बर अत्याधुनिक स्टेल्थ तंत्रज्ञानासह येते. याचे प्रोडक्शन हे १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात सुरू झाले परंतु सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर ते मर्यादीत करण्यात आले. अशी फक्त २१ विमानेच बनवण्यात आली.
बी-२ स्टेल्थ बॉम्बर इंधन न भरावे लागता ६,००० नॉटिकल मैल (११,११२ किमी) पेक्षा जास्त प्रवास करू शकते, यामुळे वेगवेगळे जगभरात कुठेही कॉन्टिनेंटल अमेरिकन तळांवरून जागतिक स्तरावर हल्ला करण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. हवेत इंधन भरता येत असल्याने बी-२ जगभरातील जवळजवळ कोणतेही लक्ष्य गाठू शकते. यापूर्वी अशी उदाहरणे मिसूरी ते अफगाणिस्तान आणि लिबिया आणि आता नुकतेच इराणमध्ये झालेला हल्ला यावेळी पाहायला मिळाली आहेत.
या विमानाची पेलोड क्षमता ही ४०,००० पौंज (१८,१४४ किलो) पेक्षा जास्त आहे त्यामुळे हे विमान पारंपारिक आणि आण्विक शस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे. हे विमान जवळपास १६ B83 अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते. विमानातील अंतर्गत भागातील शस्त्रे हे स्टेल्थ गुणधर्मांसाठी खासकरून तयार करम्यात आली आहेत.
बी-२ च्या स्टेल्थ तंत्रज्ञानामध्ये रडार-अब्जॉर्बिंग मटेरियल आणि अँग्युलर डिझाइन फिचर देण्यात आलेले आहेत जे शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणालींद्वारे त्यांना शोधू शकण्याची शक्यता अत्यंत कमी करतात. त्याचे रडार क्रॉस-सेक्शन एका लहान पक्ष्यासारखे असल्याचे म्हटले जाते, ज्यामुळे ते पारंपारिक रडारावर जवळजवळ अदृश्य होऊन जाते.