गेल्या काही दिवसांपासून भारताची राजधानी दिल्लीसह आसपासच्या परिसरात सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहे. रविवारी सकाळीही दिल्लीसह आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हा भूकंप ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. तर या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळची राजधानी काठमांडूपासून पश्चिमेला ५५ किलोमीटर अंतरावर असलेल्या धाडिंग येथे होता, अशी माहिती नेपाळ राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
युरोपीय भूमध्य भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले की, या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून १३ किलोमीटर खोलीवर होता. या भूकंपामुळे जीवितहानी किंवा नुकसान झाल्याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. राजधानी दिल्लीसह बागमती आणि गंडकी प्रांतातील इतर जिल्ह्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. PDNA अहवालानुसार, नेपाळ हा जगातील ११ वा भूकंपप्रवण देश आहे.
First published on: 22-10-2023 at 11:16 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Earthquake in nepal tremors felt in delhi with 61 magnitude rmm