Premium

शिंदे-फडणवीसांची दिल्लीत शाहांसोबत खलबतं, नेमकी कशावर झाली चर्चा? मुख्यमंत्री ट्वीट करून म्हणाले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्यात रविवारी रात्री दीड तास चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. मंत्रिमंडळ विस्तारासह अनेक मुद्द्यांवर त्यांच्यात चर्चा झाली असल्याचं समोर येत आहे.

amit shah, eknath shinde and devendra fadnavis meet in delhi
अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीत काय चर्चा झाली? (एकनाथ शिंदे ट्वीटर)

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी काल रविवारी रात्री बैठक झाली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“कृषि, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर आम्ही चर्चा केली. राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गतीने कामे सुरू असून अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. राज्यातील विविध प्रकल्पांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे, सहकार विभागाशी संबंधित बाबींवर केंद्रीय सहकार मंत्री शाह यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभत असल्याने आम्ही ही भेट घेतली. राज्यात आगामी सर्व निवडणुका (ज्यात लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा समावेश होतो) शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला”, असं ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

बहुमताने जिंकू

“महाराष्ट्राच्या विकासासाठी आमची युती ही भक्कम असून गेल्या ११ महिन्यांपासून आम्ही विकासाचे विविध निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे, रखडलेले प्रकल्प मार्गी लावत आहोत. यापुढच्या काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी, विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार ….”, असा विश्वासही त्यांनी यावेळी ट्वीटद्वारे व्यक्त केला आहे.

पुण्यातील कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी दिल्लीला रवाना झाले. त्यानंतर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नागपूर येथील कार्यक्रम आटोपून सायंकाळी दिल्ली गाठली. त्यानंतर या तिन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-06-2023 at 10:24 IST
Next Story
Apple स्टोअर्सची भारतातील विक्रमी कमाई ते ट्विटरने २५ लाख भारतीय अकाउंट्सवर घातलेली बंदी, टेक क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी एका क्लिकवर