टेस्लाचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी ट्विटरची कमान हातात घेतल्यापासून मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर अनेक प्रकारचे बदल करण्यात आले आहेत. एकीकडे कंपनीत कर्मचाऱ्यांच्या नोकर कपातीचा प्रश्न ऐरणीवर आहे. तर दुसरीकडे मस्क एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेत आहेत. यावेळी त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचा ट्विटर युजर्सला मोठा धक्का बसणार आहे. मस्क यांनी ट्विटरवर मोठी घोषणा केली आहे. मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरवर १५० कोटी अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं मस्क यांनी म्हटलं आहे.

याबाबत माहिती देताना त्यांनी म्हटलं, १५० कोटी ट्विटर अकाउंटला लवकरच बंद करण्यात येईल, जे अकाउंट अनेक वर्षांपासून सक्रीय नाहीत. अशा अकाउंटला प्लॅटफॉर्मवरून काढून टाकून नवीन युजरसाठी जागा बनवण्यात येईल. या १५० कोटी अकाउंटला काढून टाकण्याचं काम वेगानं सुरु करण्यात आलं आहे. त्यामुळे ट्विटर युजरची चिंता वाढली आहे. या लिस्ट मध्ये आपला अकाउंट आहे का? असा प्रश्न युजर्सला पडला आहे.

नक्की वाचा – तुम्ही सर्वात श्रीमंत कधी होणार? ” ट्विटर युजरने विचारलेल्या प्रश्नाला आनंद महिंद्रांचं भन्नाट उत्तर, म्हणाले, ” मी सर्वात श्रीमंत…”

एलॉन मस्क यांनी ट्विटरवर स्पष्ट सांगितलं की, ज्या १५० कोटी अकाउंटला बंद करण्यात येणार आहे, त्यामध्ये दिर्घकाळापासून सक्रीय नसलेल्या अकाउंटचा समावेश करण्यात येईल. म्हणजेच, मागील काही वर्षांपासून ज्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट शेअर करण्यात आली नाही, तसंच कोणत्याही प्रकारचं सक्रीय सहभाग दिसला नाही, अशांना इनअ‍ॅक्टिव्ह करुन बंद करण्यात येईल.

हेही वाचा – विश्लेषण: सोशल मीडियावर तुमची मतं दडपण्यासाठी खास ‘टूल्स’चा वापर? ‘ट्विटर शॅडो बॅन’ नेमकं आहे तरी काय?

तुमचाही अकाउंट होणार बंद?

बंद करण्यात येणाऱ्या १५० कोटी ट्विटर अकाउंटमध्ये तुमच्याही अकाउंटचा समावेश आहे का? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच सतावत असेल. मात्र, जे अकाउंट सक्रीय नाहीत, अशा अकाउंटलाच बंद करण्यात येणार आहेत. तसेच जे अकाउंट अनेक वर्षांपासून लॉग इन करण्यात आले नाहीत, त्यांनाही बंद करण्यात येणार आहे.