बुकर पुरस्कार विजेते प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर काही दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथील एका कार्यक्रमात हल्लेखोराने व्यासपीठावर जाऊन रश्दी यांच्यावर चाकूहल्ला केला होता. या हल्ल्यात रश्दी गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर सुमारे १५ वार करण्यात आले होते. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रश्दी यांनी एका डोळ्याची दृष्टी गमावल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांचा एक हातही निकामी झाल्याचं समजत आहे, याबाबतचा खुलासा रश्दी यांच्या एजंटने केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा हल्ला किती गंभीर होता आणि यामुळे रश्दी याचं आयुष्य कसं बदललं, याची माहिती रश्दींचे एजंट अँड्र्यू वायली यांनी स्पेनमधील ‘एल पेस’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे. रश्दी यांच्या शरीरावर अनेक खोल जखमा होत्या. डोळ्यावर वार झाल्याने त्यांनी एका डोळ्याची दृष्टी गमावली आहे. तसेच त्यांच्या मानेवर तीन गंभीर आहेत. तसेच त्यांच्या हाताच्या नसा कापल्या गेल्याने त्यांचा एक हात निकामी झाल्याची माहितीही वायली यांनी दिली.

हेही वाचा- रश्दी जिवंत असल्याचे समजल्याने खेद; हल्लेखोराचे वक्तव्य

रश्दी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत की त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे? याबाबतची माहिती देण्यास वायली यांनी नकार दिला. पण महत्त्वाची बाब म्हणजे रश्दी जगणार आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं वायली यांनी सांगितलं. १२ ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कमध्ये एका साहित्यिक कार्यक्रमात ७५ वर्षीय रश्दी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Famous writer salman rushdie lost sight of one eye and hand in fatal attack rmm