आज (२ एप्रिल) गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जात आहे. दिल्लीमध्ये देखील मराठी माणूस मोठ्या उत्साहात गुढीपाडव्याचा सण साजरा करत आहे. सध्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने बहुतांश खासदार दिल्लीत आहेत. महाराष्ट्रातील खासदार देखील सध्या दिल्लीत असल्याने दिल्लीत गुढी उभारून गुढीपाडवा सण साजरा केला. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी देखील सहकुटुंब गुढी उभारून गुढीपाडवा सण साजरा केला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गिरीश बापट म्हणाले, “आज पहिल्यांदाच पुणे सोडून दिल्लीमध्ये पाडवा साजरा होतोय. आज खूप आनंदाचा क्षण आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, आजच्या गुढीपाडव्याच्या मंगलमय दिवशी एक संकल्पही केला पाहिजे. तो संकल्प म्हणजे आता देशातील महागाई, कोरोना संकट या सगळ्या पीडा निघून जावोत आणि मोदींच्या नेतृत्वाखाली जगाचे नेतृत्व करणारा भारत देशाला पुन्हा गती मिळो.”

हेही वाचा : “….मला अनेकांच्या गळ्याचा घोट घ्यायचा आहे”, गिरीश बापट यांचं पुण्यात विधान

“ही स्फूर्ती गुढीपाडव्याच्या निमित्ताने येते. गुढी उभारणे म्हणजे संकल्प उभारणं आहे. संकल्प आणि सिद्धी यांच्यामधील अंतर प्रयत्नाने पूर्ण करायचं असतं. मी माझ्या महाराष्ट्रातील तमाम बांधवांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो,” असं म्हणत गिरीश बापट यांनी सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girish bapat comment on inflation dearness in india while wishing on gudi padwa pbs