scorecardresearch

गिरीश बापट

गिरीश बापट (Girish Bapat)हे महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य होते. हे कसबा पेठ मतदारसंघातून निवडून गेले. गिरीश बापट यांची २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवड झाली होती. गिरीश बापट यांचा जन्म ३ सप्टेंबर १९५० रोजी पुण्यात झाला. त्याने तळेगाव दाभाडे येथून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे वाणिज्य शाखेमध्ये शिक्षण घेण्यासाठी त्यांनी बीएमसीसीत प्रवेश घेतला. पदवी संपादन केल्यानंतर त्यांना टेल्कोमध्ये नोकरी लागली. नोकरी सुरु असताना लगेचच आणीबाणीचा काळ आला. आणीबाणीत सरकारविरोधी भूमिकेमुळे त्यांना १९ महिने तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगामध्ये असताना त्यांच्यातील पुढारी तयार झाला. ते सुरुवातीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांनी प्रभावित होते.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि परिवारातील संस्थांतील विविध पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली. १९८० मध्ये गिरीश बापट भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर विभागाचे प्रमुख बनले. पुढे १९८३ मध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर सलग तीन टर्म त्यांच्याकडे नगरसेवकपद होते. १९८६-८७ मध्ये ते महापालिकेत पक्षाची सत्ता नसतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष होते. १९९५ मध्ये त्यांना पहिल्यांदा आमदारकीच्या निवडणूकीचे तिकीट मिळाले. निवडणूक जिंकून गिरीश बापट आमदार झाले. तेव्हापासून ते २०१४ पर्यंत ते तब्बल पाच वेळा निवडून आले.


२०१४ मध्ये फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे मंत्रीपद देखील होते. २०१९ मध्ये काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा पराभव करत त्यांनी खासदारकी मिळवली. २९ मार्च २०२३ रोजी वयाच्या ७२ व्या वर्षी गिरीश बापट यांचे निधन झाले.


Read More
BJP, pune, politics, Executive committee, appointments
पुणे भाजपाला घराणेशाहीची लागण, जुनेजाणते घरी प्रीमियम स्टोरी

निष्ठावंतांना डावलण्याबराेबरच कार्यकारिणीमध्ये घराणेशाहीला स्थान देण्यात आल्याने भाजपचा बेगडीपणा उघड झाला आहे.

Swarda Bapat in the Executive Committee
पुणे शहर भाजपची कार्यकारिणी जाहीर; गिरीश बापट यांची स्नुषा स्वरदा बापट यांना कार्यकारिणीत स्थान

शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी कार्यकारिणी जाहीर केली असून कार्यकारिणीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या काही निकटवर्तीय कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

by election in pune
मुंबई: पोटनिवडणुका टाळण्याकडे पक्षांचा कल?

लोकसभा अथवा विधानसभेची जागा रिक्त झाल्यावर ही जागा भरण्याकरिता सहा महिन्यांमध्ये पोटनिवडणूक घेण्याची लोकप्रतिनिधी कायद्यात तरतूद आहे.

sharad pawar girish bapat
“मी गिरीश बापट यांना सांगितलं की मलाही तुमच्यासारखाच त्रास…”, शरद पवारांनी सांगितली ‘ती’ आठवण; २००४मधील प्रसंगाचाही केला उल्लेख!

शरद पवार म्हणाले, “२००४ मध्ये मला डॉक्टरांनी सांगितले होते की तुमच्याकडे साधरणतः सहा महिने आहेत. तुम्हाला काही गोष्टी करून ठेवायच्या…

girish bapat गिरीश बापट
खासदार बापट यांच्या स्मरणार्थ उद्या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा

दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या स्मरणार्थ रविवारी (१६ एप्रिल) सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

Jagdish Mulik , Pune , MP, banners, Girish Bapat
पुणे : भावी खासदार म्हणून भाजप शहराध्यक्षांची फलकबाजी

गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार का या बाबत स्पष्टता नाही. मात्र पोटनिवडणुकीपूर्वीच भाजपमधून खासदारकी मिळवण्यासाठी चढाओढ…

ajit pawar, vijay wadettiwar
“आम्ही पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार”, विजय वडेट्टीवारांच्या विधानानंतर अजित पवारांनी सुनावलं; म्हणाले, “काही माणुसकी…”

भाजपा नेते गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर आता पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.

Narayan Rane Visited Bapat family
पुण्यातील कामासाठी अधिकारवाणीने कोणाला हाक मारायची?, नारायण राणे यांची भावना; बापट कुटुंबीयांची घेतली भेट

गिरीश बापट यांचे आणि माझे अतिशय जवळचे संबंध होते. मी मुख्यमंत्री असताना त्यांचे मला कामात, कारभारात नेहमीच सहकार्य लाभले. बापट…

girish bapat गिरीश बापट
पुणे : निधनानंतर चोवीस तासांतच गिरीश बापट यांचे संपर्क कार्यालय सुरू

Girish Bapat’s contact office opened खासदार गिरीश बापट यांचे बुधवारी निधन झाल्यानंतर चोवीस तासांतच त्यांचे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले.

संबंधित बातम्या

मराठी कथा ×