अहमदाबाद : येथे अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचे एक धक्कादायक प्रकरण नुकतेच समोर आले आहे. एक १७ वर्षीय मुलगी लग्न सोहळ्यात गेली असताना अचानक गायब झाली. या मुलाचा पोलीसांकडून १० महिने कसून शोध घेण्यात आला पण ती कुठेही सापडली नाही. अखेर पोलिसांचा हा शोध ३ फेब्रुवारी रोजी एका एचआयव्हीची लागण झालेल्या व्यक्तीच्या अटकेनंतर पूर्ण झाला. पण इतके दिवस हा आरोपी पोलिसांपासून कसा लपत राहिला आणि तो सापडला का नाही? याबद्दल तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील एका बंद खोलीतून शहर गुन्हे शाखेच्या मानवी तस्करी विरोधी पथकाने (एएचटीयू)या मुलीची सुटका केली. आरोपीने या खोलीत पीडित मुलीला बंद करून ठेवले होते. ही अल्पवयीन मुलगी २२ मार्च २०२४ रोजी तिच्या पालकांबरोबर शाहीबाग येथे एका लग्न समारंभाला गेली होती. त्या दिवशी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ती बेपत्ता झाली. त्यानंतर तिच्या वडीलांनी शाहीबाग पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

शहराचे सहाय्यक पोलिस आयुक्त, विभाग ‘एफ’ यांच्या नेतृत्वाखाली तीन महिने तपास केल्यानंतरही मुलीचा ठावठिकाणा सापडला नाही. त्यानंतर पुढील तपासासाठी हे प्रकरण एएचटीयूकडे वर्ग करण्यात आले होते. तसेच पीडितेच्या वडि‍लांनी गुजरात उच्च न्यायालयात तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी करत हेबियस कॉर्पस याचिका (habeas corpus petition) दाखल केली, अशी माहिती गुन्हे शाखेच्या निवेदनात देण्यात आली आहे.

इतके दिवस कसा लपून राहिला?

अनेक राज्यांमध्ये केलेल्या तपासानंतर एएचटीयू पोलिसांना मध्य प्रदेशमधील बिजोरीच्या कोटमा येथे पीडितेचा शोध लागला. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने सुरुवातीला पीडितेला बरेजा येथील भाड्याच्या खोलीत ठेवले होते. इतकेच नाही तर आरोपीच्या आई आणि भावाने कथित त्याला पीडितेला लपवून ठेवण्यात मदत केली. या आरोपीने मुलीला कडक बंदोबस्तात ठेवले होते आणि तिच्या जेवणावर देखील बंधनं घालण्यात आली होती असे तपासात उघड झाले आहे.

वकीलाच्या सल्ल्याने फिरत राहिला

एका वकीलाकडून सल्ला घेतल्यानंतर आरोपी पीडितेला घेऊन वेगवेगळ्या शहरात फिरत राहिला. यादरम्यान तो सूरत, औरंगाबाद, बीड, हैदराबाद, नागपूर, बिलासपूर येथे गेल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान आता आरोपीला सल्ला देणाऱ्या वकिलावर देखील कारवाई केली जाणार आहे.

जवळपास दहा महिन्यानंतर पीडित मुलगी अखेर कोटमा येथे आढळून आली, जेथे आरोपीने त्याच्या नातेवाईकांच्या मदतीने घर भाड्याने घेतले होते. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने यापूर्वीही सहा मुलीचे लैगिंक शोषण केले आहे. दरम्यान त्यांना एचआयव्हीची लागण झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी सातही पीडितांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. सध्या आरोपीला शाहीबाग पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, येथे मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hiv positive man sexually exploited 17 year old girl for 10 months know how marathi crime news rak