हैद्राबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपींचा प्रौढांप्रमाणे खटला चालवण्याची मागणी हैदराबाद पोलिसांनी केली आहे. २८ मे रोजी एका अल्पवयीम मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना घडली होती. बलात्कार करणारे आरोपी हे अल्पवयीान असून ते तेलंगणातील राजकिय नेत्यांची मुले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- विमानात मुखपट्टी वापरण्यास नकार देणाऱ्यांना खाली उतरवा! ; ‘डीजीसीए’ची कंपन्यांना सूचना

आरोपींचा राजकीय कुटुंबाशी संबंध

या प्रकरणातील सहा आरोपींपैकी ४ आरोपी हे अल्पवयीन आहेत. आणि सगळे राजकीय कुटुंबासोबत जोडले गेले आहेत. आरोपी ओमेर खान हा तेलंगणातील एका मोठ्या राजकीय कुटुंबाचा सदस्य असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आरोपी सदुद्दीन मलिकचे वडील हे टीआरएसचे नेते आहेत. आणखी एक आरोपी एमआयएम पक्षाच्या नेत्याचा मुलगा असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा- COVID19 : देशात मागील २४ तासांत ७ हजारांहून अधिक नवीन करोनाबाधित आढळले

सामुहिक बलात्कार

हैदराबादमध्ये इंटरमिजिएटची एक १७ वर्षीय विद्यार्थिनी गत शनिवारी रात्री पबमध्ये वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती. तेथून तिला घरी सोडण्याची बतावणी करून कारमधून नेताना किमान चार अल्पवयीन मुलांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर दोन दिवसांनी, शुक्रवारी पोलिसांनी या मुलीवर बलात्कार झाल्याच्या आरोपास दुजोरा दिला. वैद्यकीय तपासणीत तसे आढळून आले आहे.  या प्रकरणातील आरोपींची ओळख पटली असून त्यापैकी एकाच्या मालकीची कार जप्त करण्यात आली आहे. हे आरोपी तेलंगणातील राजकिय नेत्यांची मुले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागल्याचे दिसून येत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hyderabad gang rape case police want juvenile accused adults minor raped dpj