Indore Honeymoon Couple: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणात सोमवारी एका पाठोपाठ एक धक्कादायक असे खुलासे समोर आले. मे महिन्यात हे जोडपं बेपत्ता झालं. मात्र २ जून रोजी राजाचा मृतदेह मिळाला. त्याचा अपघाती मृत्यू नसून हत्या झाल्याची बाबही समोर आली. राजाची हत्या त्याची पत्नी सोनमने केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलिसांनी सोनमसह अन्य चार जणांना अटक केली आहे. दरम्यान राजा आणि सोनम यांच्या लग्नातील एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ज्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
सोनम आणि राजा रघुवंशी यांच्या लग्नाचा व्हिडिओ
सोनम आणि राजा रघुवंशी यांच्या लग्नाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोनम आणि राजा बेपत्ता झाल्यावर लोक सहानुभूती व्यक्त करण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करत होते, पण आता लोक या व्हिडिओमधील सोनम आणि राजाच्या हावभावांकडे लक्ष देत आहेत. काही लोक म्हणतात की व्हिडिओमध्ये राजा रघुवंशी आनंदी दिसत आहे, परंतु सोनमच्या चेहऱ्यावर ती आनंदी नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते, उलट तिच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नाहीत.या व्हिडिओमध्ये सोनमच्या चेहऱ्यावर आनंद किंवा समाधानाचे कोणतेही भाव दिसत नसल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हे दृश्य पाहून ‘सोनम खरंच खूश होती का?’ असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

या व्हिडिओमध्ये राजा रघुवंशी मोठ्या उत्साहात सोनमला सिंदूर लावताना दिसतो. पण सोनमचा चेहरा पूर्णपणे निर्विकार आहे. तिच्या डोळ्यात कसलाही आनंद दिसत नाही आणि ती हसतानाही दिसत नाही. तिची ही देहबोली अनेक प्रश्न निर्माण करत आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर @Incognito_qfs नावाच्या एक्स अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या एका वापरकर्त्याने एका लांबलचक नोटमध्ये म्हटले आहे की, “सोनम आणि राजा रघुवंशीच्या लग्नाचा व्हिडिओ पाहून तुम्हाला कळेल की सोनम या लग्नावर खूश नव्हती. जर सोनमने लग्नाला नकार दिला असता तर राजा रघुवंशी जिवंत असता. तिच्याकडे कॉन्ट्रॅक्ट किलर भाड्याने घेण्याचे धाडस होते पण तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्याचे धाडस नव्हते. सोनमच्या पालकांनाही दोषी ठरवले पाहिजे. त्यांना माहित असेल की तिचा एक बॉयफ्रेंड आहे. सर्व काही माहित असूनही….त्यांनी राजा रघुवंशीला सत्य न सांगता तिचे लग्न राजा रघुवंशीशी लावून दिले.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indore honeymoon couple raja raghuvanshi murder sonam raghuvanshi wedding video goes viral on social media srk