Israel Iran Ceasefire Breaking News Updates : गेल्या काही दिवसांपासून इस्रायल व इराण यांच्यात चालू असलेल्या युद्धामध्ये नंतर अमेरिकेनंही उडी घेतली. अमेरिकेनं इराणमधील आण्विक तळांवर हल्ला केल्यानंतर दोन दिवसांनी अचानक दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी झाल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. पण इराणकडून लागलीच अद्याप कोणतीही सहमती झालेली नसल्याची प्रतिक्रिया आली आहे. त्यामुळे युद्धासंदर्भात नेमकं काय ठरलंय, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यानदेखील डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांच्या आधीच शस्त्रसंधी झाल्याचं जाहीर केलं होतं.
Israel Iran News Live Updates, 24 June 2025: इस्रायल-इराण संघर्षाचे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर…
“इस्रायलने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं नाही तर आम्हीही…’, इराणने शस्त्रविरामाबाबत मांडली भूमिका
इराण आणि इस्रायल यांच्यात संघर्ष सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशात शस्त्रविरामाबाबत एकमत झाले, मात्र याच्या काही तासांतच तेहरानने तेव अवीववर नव्याने क्षेपणास्त्र डागल्याचा दावा इस्रायलने केला आहे. हे शस्त्रविरामाचे उल्लंघन असल्याचे इस्रायलने म्हटले. यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इस्रायलवरही संतापले आहेत. इराणवर बॉम्ब टाकू नका, तुमच्या वैमानिकांना परत बोलवा, जर तुम्ही असं केलं तर ते एक मोठं उल्लंघन ठरेल, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं. मात्र, त्यानंतर काही मिनिटांतच तेहरानमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता इराणने शस्त्रविरामाबाबत भूमिका मांडली असून इस्रायलने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं नाही तर आम्हीही करणार नाही, असं इराणने स्पष्ट केलं आहे.
‘बॉम्ब टाकू नका’, असं ट्रम्प यांनी इस्रायलला सांगितल्यानंतर काही मिनिटांतच तेहरानमध्ये स्फोटांचे आवाज
इराण आणि इस्रायल यांच्यात संघर्ष सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशात शस्त्रविरामाबाबत एकमत झाले, मात्र याच्या काही तासांतच तेहरानने तेव अवीववर नव्याने क्षेपणास्त्र डागल्याचा दावा इस्रायलने केला आहे. हे शस्त्रविरामाचे उल्लंघन असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. दरम्यान, यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इस्रायलवरही संतापले आहेत. इराणवर बॉम्ब टाकू नका, तुमच्या वैमानिकांना परत बोलवा, जर तुम्ही असं केलं तर ते एक मोठं उल्लंघन ठरेल, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं. मात्र, त्यानंतर काही मिनिटांतच तेहरानमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आल्याची माहिती समोर आली आहे.
Donald Trump : “आता बॉम्ब टाकू नका, वैमानिकांनाही परत…”, डोनाल्ड ट्रम्प संतापले; म्हणाले, ‘मी इस्रायलवर…’
“बॉम्ब टाकू नका, वैमानिकांना परत बोलवा”, डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलवर संतापले
इराण आणि इस्रायल यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. यादम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशात शस्त्रविरामाबाबत एकमत झाले, मात्र याच्या काही तासांतच तेहरानने तेव अवीववर नव्याने क्षेपणास्त्र डागल्याचा दावा इस्रायलने केला आहे. हे शस्त्रविरामाचे उल्लंघन असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. दरम्यान, यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इस्रायलवरही संतापले आहेत इराणवर बॉम्ब टाकू नका, तुमच्या वैमानिकांना परत बोलवा, जर तुम्ही असं केलं तर ते एक मोठं उल्लंघन ठरेल, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
“इतिहासात कोणत्याही देशाने…”, अमेरिकेच्या लष्करी तळांवरील हल्ल्यानंतर इराणच्या राजदूतांचा पुन्हा ट्रम्प यांना इशारा
अमेरिकेने तीन अणुकेंद्रांवर केलेल्या माऱ्याचे प्रत्युत्तर म्हणून सोमवारी इराणने कतार आणि इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. यामुळे इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कतारनेही आपल्या भूमिवर झालेल्या हल्ल्याचे उत्तर दिले जाईल, असा इशारा इराणला दिला.
Iran Israel Conflict : ट्रम्प यांची मध्यस्थी अपयशी? इराणकडून शस्त्रविरामाचे उल्लंघन, इस्रायलचे सैन्याला कठोर प्रत्युत्तर देण्याचे आदेश
Air India Flights to Middle-East: एअर इंडियाची मध्य पूर्वेकडील विमान वाहतूक लवकरच सुरू होणार
एअर इंडियाची मध्य पूर्वेकडील विमान सेवा लवकरच पूर्ववत होणार, येत्या २५ जूनपासून विमान उड्डाणं टप्प्याटप्प्याने पूर्ववत केली जातील – एअर इंडियानं सोशल मीडियावर केली पोस्ट
"As airspaces gradually reopen in certain parts of the Middle East, Air India will progressively resume flights to the region starting today, with most operations to and from the Middle East resuming from 25 June. Flights to and from Europe, previously cancelled, are also being… pic.twitter.com/aFgnPPQ8d7
— Press Trust of India (@PTI_News) June 24, 2025
Iran Israel Conflict : “इतिहासात कोणत्याही देशाने…”, अमेरिकेच्या लष्करी तळांवरील हल्ल्यानंतर इराणच्या राजदूतांचा पुन्हा ट्रम्प यांना इशारा
Israel Accepts Ceasefire: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी शस्त्रसंधीचा स्वीकार केला
इस्रायलनं शस्त्रसंधीच्या प्रस्तावाचा स्वीकार केला आहे असून इराणविरुद्ध सुरू केलेल्या युद्धाचे सर्व हेतू पूर्ण झाले आहेत – बेंजामिन नेतान्याहू
Netanyahu says Israel accepts ceasefire and that it has achieved war goals against Iran, reports AP. pic.twitter.com/bOBGNlMRlh
— Press Trust of India (@PTI_News) June 24, 2025
हे युद्ध कदाचित अनेक वर्षांपर्यंत चालू शकलं असतं. यातून कदाचित संपूर्ण मध्य-पुर्वेचा विद्ध्वंस झाला असता. पण ते झालं नाही. कधीच होणार नाही. इश्वर इस्रायलचं भलं करो, इराणचं भलं करो, मध्य-पूर्वेचं भलं करो, अमेरिकेचं भलं करो, संपूर्ण जगाचं भलं करो – डोनाल्ड ट्रम्प यांची सोशल मीडिया पोस्ट
US President Donald Trump posts, "CONGRATULATIONS TO EVERYONE! It has been fully agreed by and between Israel and Iran that there will be a Complete and Total CEASEFIRE (in approximately 6 hours from now, when Israel and Iran have wound down and completed their in progress, final… pic.twitter.com/a6mSgitrzn
— ANI (@ANI) June 23, 2025
Donald Trump Post: डोनाल्ड ट्रम्प यांची शस्त्रसंधीबाबत पोस्ट
“आता शस्त्रसंधी लागू झाली आहे. कृपया तिचं उल्लंघन करू नका”, अशी पोस्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय प्रमाणवेळेनुसार १० वाजून ४८ मिनिटांनी त्यांच्या ट्रूथ या सोशल मीडियावरील अकाऊंटवर केली आहे.
Iran Israel Ceasefire: शत्रूवर शस्त्रविराम लादला – इराणी वृत्तवाहिनीचा दावा
इराणनं हा शस्त्रविराम मान्य करण्यासाठी इस्रायलवर दबाव आणला होता, असा दावा इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीनं अमेरिकेनं तेहरानमधील आण्विक तळावर हल्ला केल्यानंतर प्रत्युत्तरादाखल इराणनं कतारमधील अमेरिकेच्या अल उदेद या हवाई तळावर हल्ला चढवला होता. या हल्ल्यामुळेच इस्रायलला शस्त्रविराम मान्य करावा लागला, असा दावा इराणकडून आता केला जात आहे.
Iran Announced Ceasefire: इराणकडून अखेर शस्त्रविरामाची घोषणा
इराणची सरकारी वृत्तवाहिनी IRINN ने शस्त्रविराम लागू झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. इराणने कतारमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर सोमवारी हल्ला केल्यानंतर हा शस्त्रविराम इस्रायलला मान्य करावा लागल्याचा दावा इराणमधील सरकारी वृत्तवाहिनीने केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या शस्त्रविरामाच्या घोषणेबाबत संभ्रम निर्माण झाला असला, तरी त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती मात्र घटल्या आहेत. ब्रेंट क्रूड ऑइलचे दर ४ टक्क्यांनी कमी होऊन ६८ डॉलर्स प्रतिबॅरलपर्यंत खाली आले आहेत. सोमवारीही ७ टक्क्यांनी किमती घटल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे इस्रायलनं इराणवर हल्ला केल्याच्या आधी असणाऱ्या दरांपेक्षाही आत्ता कच्च्या तेलाच्या किमती घटल्या आहेत.
जोपर्यंत इराणकडून हल्ले होणार नाहीत, तोपर्यंत इस्रायलला युद्धबंदी मान्य असल्याचं सांगितलं जात आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी यासंदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे,.
Americans in Israel: इस्रायलमधून २५० अमेरिकन नागरिकांचं स्थलांतर
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल-इराण युद्धबंदीची घोषणा केलेली असतानाही जवळपास २५० अमेरिकन नागरिकांनी इस्रायल सोडून अमेरिका गाठली आहे.
Israel Iran War Updates: तेहरानमधील नागरिकांसाठी इस्रायलच्या सुचना
डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रविरामाची घोषणा केल्यानंतरदेखील इस्रायल व इराणकडून अद्याप युद्धबंदीची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. उलट इस्रायलयनं तेहरानमधील आपल्या नागरिकांना सतर्क राहण्याचे व शहर सोडून सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले आहे. याआधी इस्रायलनं मेहरान व डिस्ट्रिक ६ या शहरांमधील नागरिकांना शहर सोडून जाण्याचं आवाहन केलं होतं.
Explosions in Iran: डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर इराणमध्ये अनेक ठिकाणी हल्ले
डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रविरामाची घोषणा केल्यानंतर इराणमध्ये अनेक शहरांमध्ये स्फोटांचे मोठे आवाज येत असल्याचं वृत्त बीबीसीनं दिलं असून त्यानंतर इराणनं तेहरानमधील हवाई तळावरील कारवाया वाढवल्या आहेत.
इराणचे परराष्ट्रमंत्री अरागची यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या सैन्याचे आभार मानले आहेत
The military operations of our powerful Armed Forces to punish Israel for its aggression continued until the very last minute, at 4am.
— Seyed Abbas Araghchi (@araghchi) June 24, 2025
Together with all Iranians, I thank our brave Armed Forces who remain ready to defend our dear country until their last drop of blood, and who…
Iran-Israel War Updates: इस्रायलची कोणतीही प्रतिक्रिया नाही
दरम्यान, इस्रायलनं अद्याप डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा किंवा इराणनं फेटाळलेली शस्त्रसंधी झाल्याची शक्यता यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यावर आता चर्चा सुरू झालेली आहे.
Iran-Israel Ceasefire Updates: ट्रम्प यांचा दावा इराणनं फेटाळला
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण व इस्रायलमध्ये युद्धबंदी झाल्याची घोषणा केल्यानंतर इराणनं त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरागची यांनी इस्रायलशी अशी कोणतीही सहमती झाली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. “जर इस्रायलनं त्यांचे हल्ले तातडीने थांबवले, तर इराणचा प्रतिहल्ले करण्याचा कोणताही मानस नाही”, असंअरागची यांनी स्पष्ट केलं आहे.
Iran-Israel Ceasefire: इराण-इस्रायलमधील युद्धबंदीची डोनाल्ड ट्रम्प यांनी केली घोषणा; म्हणाले, ‘१२ दिवसांचे युद्ध…’
Iran-Israel Ceasefire News: इराणचा इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला
ट्रम्प यांच्या शस्त्रसंधीच्या घोषणेनंतरही इराणचा इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला, सायरन वाजत असल्याची इस्रायलच्या संरक्षण विभागाची सोशल मीडियावर माहिती
?Sirens sounding in Israel due to a missile launch from Iran?
— Israel Defense Forces (@IDF) June 24, 2025
Donald Trump on Israel-Iran War: इराण-इस्रायल युद्ध संपल्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
“सर्वांचे अभिनंदन! इस्रायल आणि इराण यांनी १२ तासांसाठी शस्त्रविरामास पूर्णपणे सहमती दर्शवली असून या काळात दोन्ही देश त्यांच्या अंतिम मोहिमा पूर्ण करतील. त्यानंतर हे युद्ध संपले आहे, असे अधिकृतपणे मानले जाईल”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
US President Donald Trump posts, "CONGRATULATIONS TO EVERYONE! It has been fully agreed by and between Israel and Iran that there will be a Complete and Total CEASEFIRE (in approximately 6 hours from now, when Israel and Iran have wound down and completed their in progress, final… pic.twitter.com/a6mSgitrzn
— ANI (@ANI) June 23, 2025
इस्रायल-इराणमधील संघर्ष लाईव्ह अपडेट्स
US Israel Iran News Live Updates, 24 June 2025: डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्णपणे शस्त्रसंधीची केली घोषणा!
