Israel Iran News Highlights: गेल्या आठवड्याभरापासून इस्रायल व इराण यांच्यात चालू असलेला संघर्ष आता विकोपाला गेला आहे. एकीकडे इस्रायलकडून इराणवर हवाई हल्ले होत असताना इराणकडूनही त्याला प्रत्युत्तर दिलं जात आहे. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलला पाठिंबा असल्याचं जाहीर करत इराणला जाहीर इशारे द्यायला सुरूवात केली. मंगळवारी ट्रम्प यांनी थेट इराणचे सर्वोच्च नेते अली हुसेनी खोमेनी यांना ठार करण्यासंदर्भात विधान केलं. यानंतर आता इराणकडूनही आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे.
Israel Iran Battle Highlights, 18 June 2025: डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर आता इराणची आक्रमक भूमिका
Russia Stepped in Israel Iran War: इस्रायल-इराण संघर्षात रशियाची उडी
“इस्रायलकडून इराणच्या शांततापूर्ण आण्विक तळांवर होणारे हल्ले हे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. इस्रायलच्या हल्ल्यांनी जगाला आण्विक युद्धाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं आहे”, अशी भूमिका रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं काढलेल्या निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
Russia Stepped in Israel Iran War: इस्रायल-इराण संघर्षात रशियाची उडी
एकीकडे इस्रायलच्या बाजूने अमेरिकेनं इराणला इशारे द्यायला सुरुवात केल्यानंतर आता रशियानं या संघर्षात उडी घेतली आहे. इस्रायलकडून इराणवर करण्यात येत असलेले हल्ले बेकायदेशीर असून इराणच्या आण्विक कार्यक्रमासंदर्भात फक्त चर्चेतूनच तोडगा निघू शकतो, अशी भूमिका रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली आहे.
Iran Attacked Israel: मध्यरात्री इराणकडून इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ले
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खोमेनी यांनी ‘आता लढाई सुरू’ अशा आशयाची पोस्ट केल्यानंतर इराणकडून इस्रायलवर मोठ्या प्रमाणवार ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. खुद्द इस्रायलच्या लष्करानं यासंदर्भातली माहिती दिली असून इराणकडून क्षेपणास्त्र डागली जात असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या पार्श्वभूमीवर इस्रायलच्या उत्तरेकडील भागात व हैफा भागात हाय अलर्ट देण्यात आला आहे.
Alatollah Ali Khamenei Warns: आता लढा सुरू – असा इशारा खामेनी यांनी दिला आहे
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणच्या सर्वोच्च नेत्यांना मारण्याची भाषा केल्यानंतर आता इराणकडूनही त्याला सडेतोड उत्तर देण्यात आलं आहे. ‘आता लढा सुरू’ अशी पोस्ट अयातु्लाह अली खोमेनी यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर केली आहे.
به نام نامی #حیدر، نبرد آغاز میگردد
— KHAMENEI.IR | فارسی ?? (@Khamenei_fa) June 17, 2025
علی با ذوالفقار خود، به #خیبر باز میگردد#الله_اکبر pic.twitter.com/yGYrXUDGoK
Donald Trump : इराण-इस्रायल संघर्ष विकोपाला, ट्रम्प यांचा इराणच्या सर्वोच्च नेत्याला इशारा; म्हणाले, ‘खामेनी कुठे लपलेत हे माहिती आहे, पण…’
Israel Iran Conflict : तेहरान सोडण्यासाठी लोकांची धावपळ; इस्रायल-इराणच्या संघर्षाचा काय परिणाम होतोय? जाणून घ्या १० महत्वाच्या घडामोडी
Israel Iran Conflict : तेहरान सोडण्यासाठी लोकांची धावपळ; इस्रायल-इराणच्या संघर्षाचा काय परिणाम होतोय? जाणून घ्या १० महत्वाच्या घडामोडी
Israel Iran Conflict : इराण अण्वस्रनिर्मितीपासून काही महिने नाही, तब्बल ३ वर्षे दूर! अमेरिकी गुप्तचर खात्याची माहिती
Israel Iran Conflict: डोनाल्ड ट्रम्प यांना इस्रायल-इराण संघर्षात शस्त्रसंधी नकोय; पत्रकारांना म्हणाले, “इराण अण्वस्त्र…”
इराण अण्वस्रनिर्मितीपासून काही महिने नाही, तब्बल ३ वर्षे दूर! अमेरिकी गुप्तचर खात्याची माहिती, (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Israel Iran Conflict Highlights, 18 June 2025: इस्रायल-इराण संघर्षाचा जगावर काय परिणाम होणार?
