उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात गुरूवारी सकाळी झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. लोलाब परिसरात चार दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराकडून शोध मोहिम हाती घेण्यात आली. शोध मोहिम सुरू असताना लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर गोळीबार केला. भारतीय जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. मात्र, हे दहशतवादी कोणत्या संघटनेचे आहेत, याची ओळख अद्यापही पटलेली नाही. ही कारवाई अद्यापही सुरु असून अन्य दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 21-04-2016 at 10:04 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jk two unidentified militants killed in gun battle in kupwara