Joe Biden diagnosed with aggressive prostate cancer : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सरचे निदान झाले आहे. त्यांच्या कार्यालयाकडून गुरूवारी याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. बायडन यांच्या आरोग्य तपासणीमधून त्यांच्या आरोग्याबद्दल काही चिंताजनक बाबी समोर आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रोस्टेस्ट कर्करोगाचे सेल त्यांच्या हाडांपर्यंत पसरले आहेत. जो बायडेन यांच्या कार्यालयाकडून त्यांच्या आरोग्याबद्दल अपडेट देण्यात आली आहे. ज्यामध्ये बायडेन आणि त्यांचे कुटुंबिय त्यांच्या कर्करोगाच्या उपचारांबद्दल विचार करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

बायडेन यांच्या कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे की, या आजाराचे हे अधिक आक्रमक रूप आहे, मात्र कॅन्सर हार्मोन-संवेदनशील असल्याचे दिसून येत आहे. ज्यामुळे त्याचे प्रभावीपणे नियंत्रण करता येईल अशी शक्यता व्यक्त होत आहे. माजी राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि कुटुंबिय डॉक्टरांबरोबर मिळून उपचाराच्या पर्यायांवर चर्चा करत आहेत.

प्रोटेस्ट कर्करोग हा १ ते १० पर्यंत ग्लीसन स्कोरने रेट केला जातो, ज्यामध्ये निरोगी पेशींच्या तुलनेत कर्करोगाच्या पेशी किती वेगळ्या दिसतात हे दर्शवले जाते. बायडेन यांचा हा स्कोर ९ आहे, ज्याचा अर्थ त्यांचा कर्करोग हा धोकादायक स्तरापर्यंत पोहचला असल्याचे दिसून येते.

डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलं दु:ख

बायडन यांच्या आजाराबद्दल राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यांनी मेलनिया आणि ते स्वत: बायडेन यांच्या मेडिकल कंडिशनबद्दल ऐकून दु:खी असल्याचे म्हटले आहे, तसेच त्यांनी बायडेन यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

याबरोबरच अमेरिकेच्या माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी देखील बायडेन यांच्यासाठी प्रार्थना केली आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये हॅरिस आणि त्यांचे पती जहलस एमहॉफ यांनी बायडन यांच्या आरोग्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर दु:ख व्यक्त केले आहे. हॅरिस म्हणाल्या की डग आणि मी माजी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना प्रोस्टेट कर्करोग झाल्याबद्दल माहिती मिळाल्याने दु:खी आहोत. त्या पुढे म्हणाल्या की बायडन एक योद्धा आहेत आणि मला मला माहिती आहे की ते या आव्हानाचा सामना त्याच ताकदीने आणि विश्वासाने करतील, ज्याचे प्रतिबिंब त्यांचे जीवन आणि नेतृत्वा यामध्ये कायम पाहायला मिळाते. आम्ही ते पूर्णपणे आणि लवकर बरे होतील अशी आशा व्यक्त करतो.

जो बायडन हे २०२१ ते २०२५ पर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी गेल्या वर्षी जुलै मध्ये पुन्हा निवडणूक लढण्याचा निर्णय मागे घेतला होता. त्यानंतर कमला हॅरिस यांना डेमोक्रॅटीक पक्षाने उमेदवार बनवले होते, मात्र नोव्हेंबर २०२४ मध्ये ट्रम्प यांनी त्यांचा पराभव केला. जो बायडेन यांना कर्करोगाचे निदान झाल्याने अमेरिकन राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. अनेकांचे म्हणणे आहे की या आजारपणामुळे बायडन यांच्या सार्वजनिक आयुष्यावर पूर्णविराम लागू शकतो.

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली चिंता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बायडेन यांच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. जो बायडेन यांच्या आरोग्याबद्दल ऐकून काळजी वाटली. त्यांच्या लवकर आणि पूर्ण बरे होण्यासाठी शुभेच्छा. आमच्या संवेदना डॉ. जिल बायडेन आणि त्यांच्या कुटुंबियांबरोबर आहेत, असे मोदी म्हणाले आहोत.