Tejashwi Yadav Raghopur Election Result 2025: उत्तर भारतातील राजकारणाच्या बाबतीत अतिशय संवेदनशील मानले जाणारे राज्य म्हणजे बिहार. यंदाची विधानसभा निवडणूक ही अनेक कारणांसाठी महत्त्वाची आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांचे राजकीय भवितव्य या निवडणुकीतून ठरणार होते. अतिशय प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत महागठबंधनचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार तेजस्वी यादव राघोपूर विधानसभा मतदारसंघातून संघर्ष करत होते. मात्र अखेर त्यांचा विजय झाला आहे.

राघोपूर विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या ३२ फेऱ्या झाल्या. तेजस्वी यादव यांना १ लाख १८ हजार ५९७ मते मिळाली. तर भाजपाचे सतीश कुमार यांना १ लाख ४ हजार ६५ मते मिळाली. तब्बल १४,५३२ मतांनी सतीश कुमार यांचा पराभव झाला.

सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये तेजस्वी यादव पिछाडीवर होते. त्यामुळे आरजेडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये त्यांनी आघाडी घेतली.

तेजस्वी यादव यांनी कोणती आश्वासने दिली होती?

माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरीची हमी देणारे आश्वासन दिले होते. महागठबंधनने त्यांच्या जाहीरनाम्याला ‘तेजस्वी प्रण’ असे नाव दिले होते. जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणे, २०० युनिटपर्यंत मोफत वीज देणे, राज्यात दारुबंदी कायदा अपयशी ठरला असून तो रद्द करणे, असे आश्वासन तेजस्वी यादव यांनी दिले होते.

राघोपूर विधानसभेचे महत्त्व?

१९९५ मध्ये राष्ट्रीय जनता दलाचे संस्थापक, ज्येष्ठ नेते लालू प्रसाद यादव यांनी राघोपूर मतदारसंघावर वर्चस्व स्थापन केले होते. तेव्हापासून हा यादव यांचा गड मानला जातो. २०१०-२०१५ वगळता मागच्या दोन निवडणुकीत या मतदारसंघातून तेजस्वी यादव यांचा विजय झालेला आहे.

कोण आहेत सतीश कुमार?

सतीश कुमार यांनी १५ वर्षांपूर्वी तेजस्वी यादव यांच्या मातोश्री आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांचा पराभव केला होता. त्यामुळे आता ते तेजस्वी यादव यांचाही पराभव करतात की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ५९ वर्षीय सतीश कुमार यांनी आरजेडी पक्षातून राजकारणाची सुरुवात केली होती.

२०१० साली झालेल्या निवडणुकीत सतीश कुमार यांनी राबडी देवी यांचा १३,००० हजार मतांनी पराभव केला होता. त्यानंतर २०१५ साली सतीश कुमार यांनी पुन्हा एकदा निवडणूक लढवली होती. मात्र तेजस्वी यादव यांनी २०१५ साली त्यांचा पराभव केला होता.

कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?

आघाडीपक्ष२०२० चा निकाल
एनडीएजनता दल (संयुक्त)४३
भारतीय जनता पक्ष७४
विकासशील इन्सान पार्टी
हिंदुस्थानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष)
महाआघाडीराष्ट्रीय जनता दल७५
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस</td>१९
सीपीआय (एमएल) लिबरेशन१२
भारतीय कम्युनिस्ट पक्ष
सीपीआय (मार्क्सवादी)
इतर
एकूण२४३

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या विजयाचे श्रेय बिहारच्या जनतेला दिले आहे. ‘बिलकूल गर्दा उडा दिया’, असे म्हणत त्यांनी या मोठ्या विजयावर आनंद व्यक्त केला होता. २०२० च्या तुलनेत भाजपा-जदयूला यंदाच्या निवडणुकीत भाजपाला अधिक जागा मिळाल्याचे निकालावरून दिसून येत आहे.