Prayagraj Mahakumbh 2025 Updates : राज्यात मर्सिडिजवरून राजकीय गदारोळ सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मंत्र्यांसह प्रयागराजला पोहोचले आहेत. आज त्यांनी त्रिवेणी संमगावर पवित्र स्नान केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्याच आठवड्यात प्रयागराजला जाऊन आले. त्यांच्यानंतर लागलीच एकनाथ शिंदेंनी दौरा आखला आहे. त्यांच्याबरोबर शिवसेनेचे काही आमदार आणि खासदारही आहेत. अमृतस्नान केल्यानंतर त्यांनी राज्यातील सफाई कर्मचाऱ्यापासून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्याचं कौतुक केलं.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “६० कोटी लोक येथे आले. कोणालाही काही त्रास झाला नाही. सफाई कर्मचाऱ्यापासून या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची संपूर्ण टीम या कामात गुंतली आहे. हा मोठा गिनिज बुक रेकॉर्ड आहे. हा जगातील सर्वांत मोठा महाकुंभ आहे. हा जगातील सर्वांत मोठा समागम आहे. येथे येणारा चांगले विचार आणि ऊर्जा घेऊन जाणार.”

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब प्रयागराज येथील महाकुंभ येथे शाहीस्नान केले.

Live Updates
14:25 (IST) 24 Feb 2025

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांनीही महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान केले

13:17 (IST) 24 Feb 2025

अभिनेता अक्षय कुमारनेही महाकुंभमेळ्यात केले पवित्र स्नान

12:30 (IST) 24 Feb 2025
मंत्री पंकजा मुंडे यांनी महाकुंभमेळ्यात केलं पवित्र स्नान

11:29 (IST) 24 Feb 2025

महाकुंभमेळ्यात जाण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवासस्थानातून रवाना

महाकुंभमेळ्यात जाण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवासस्थानातून रवाना

11:25 (IST) 24 Feb 2025

DCM Eknath Shinde in Mahakumbh Mela 2025 :

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज त्यांच्या आमदारांसहित प्रयागराजला जाणार आहेत.

त्यापैकी काही आमदार प्रयागराजला दाखल झाले आहेत.