केरळमध्ये एका बकरीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी रात्री कासरगोड जिल्ह्यात ही विकृत घटना घडली आहे. गरोदर असणाऱ्या या बकरीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर आरोपीने तिची हत्या केली. आरोपीची ओळख पटली असून तो मूळचा तामिळनाडूचा असून एका हॉटेलमध्ये कर्मचारी आहे. हॉटेल मालकाने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी सेंथिलला अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हॉटेल मालकाने दिलेल्या माहितीनुसार, रात्री ११ वाजता कर्मचाऱ्यांना बकरीच्या ओरडण्याचा आवाज आल्याने जाग आली. त्यांनी बाहेर येऊन पाहिलं तर बकरी रक्तबंबाळ अवस्थेत होती. यावेळी त्यांना आरोपी तेथून पळून जात असल्याचा प्रयत्न करता दिसला. आरोपी सेंथिल गेल्या दोन वर्षांपासून हॉटेलमध्ये काम करत होता.

ही बकरी हॉटेल मालकाची होती. हॉटेलच्या मागे शेडमध्ये तिला बांधण्यात आलं होतं. पोलिसांनी घटनेची दखल घेतली असून आरोपीवर पशु क्रूरतेच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. तसंच अनैसर्गिक कृत्य केल्याचीही नोंद आहे. हॉटेल मालकाने या कृत्यामध्ये अजून दोघे सहभागी होते असा आरोप केला होता. पण पोलिसांना तपासात सेंथिल एकटा असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन करणार्‍या शासकीय पशुवैद्यकीय शल्यचिकित्सकांच्या प्राथमिक अहवालात बकरीवर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. सविस्तर अहवालानंतरच मृत्यूचे कारण समोर येईल”.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man arrested for raping killing pregnant goat in kerala sgy