मे महिन्यापासून मणिपूर राज्यात हिंसा सुरू आहे. दोन जातीय समुदाय एकमेकांसमोर उभे ठाकल्याने राज्य अशांत झालं आहे. दरम्यान, दिवसेंदिवस येथील परिस्थिती चिघळत गेल्याने मणिपूर राज्य अशांत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार, १९ विशिष्ट पोलीस ठाणे क्षेत्र वगळता संपूर्ण राज्य सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (AFSPA) अंतर्गत शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. विविध अतिरेकी गटांच्या हिंसक कारवायांवर लक्ष ठेवण्याकरता संपूर्ण मणिपूर राज्यात नागरी प्रशासनाच्या मदतीसाठी सशस्त्र दलांचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. राज्यातील एकूणच कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आणि राज्य यंत्रणेची क्षमता लक्षात घेता, राज्य सरकारने सध्याच्या अशांत क्षेत्राच्या स्थितीवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असं राज्य सरकारने जाहीर केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.

हेही वाचा >> मणिपूरमधील बेपत्ता विद्यार्थ्यांचा मृत्यू; सरकारचे संयम राखण्याचे आवाहन

मे महिन्यापासून मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदाय एकमेकांसमोर आले आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मणिूपर राज्यात हिंसाचार सुरू आहे. महिलेची नग्न धिंड, गोळीबार, जाळपोळ आदी घटनांमुळे मणिपूर अशांत झाले आहे. त्यामुळे संभाव्य परिस्थिती टाळण्यासाठी सरकारने पुढील सहा महिन्यांसाठी राज्यात निर्बंध लागू केले आहेत. १ ऑक्टोबरपासून हे निर्बंध लागू होणार आहेत. तसंच, इंटरनेट सेवाही खंडित केली आहे.

इम्फाळ, लॅम्फेल, सिटी, सिंगजामेई, सेकमाई, लामसांग, पटसोई, वांगोई, पोरोम्पॅट, हेनगांग, लमलाई, इरिलबुंग, लीमाखोंग, थौबल, बिष्णुपूर, नंबोल, मोइरांग, काकचिंग आणि जिरीबाम हे पोलीस ठाणे मात्र अशांत क्षेत्रातून वगळण्यात आले आहे.

बेपत्ता विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे मणिपूरमध्ये पुन्हा खळबळ

मणिपूरमध्ये जुलै महिन्यापासून बेपत्ता असलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या मृतदेहांची छायाचित्रे सोमवारी समाजमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या विद्यार्थ्यांचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. बेपत्ता विद्यार्थ्यांची दोन छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाली. एका छायाचित्रात त्यांच्याबरोबर दोन सशस्त्र व्यक्ती दिसत आहेत, तर अन्य एका छायाचित्रात त्यांचे मृतदेह आहेत. त्यानंतर काही तासांमध्येच राज्य सरकारने लोकांना संयम राखण्याचे आणि अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांचे अपहरण आणि हत्येचा तपास करू देण्याचे आवाहन केले. तसेच कोणताही अनुचित प्रसंग उद्भवू नये यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manipur government declares entire state as disturbed area amid violence sgk