काश्मीरमधील पुलवामा येथील गुडूरा या गावात दहशतवाद्यांनी एका पोलीस कॉन्स्टेबलवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. रियाझ अहमद ठोकर असे त्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. हल्ल्यानंतर रियाझ यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडिताची हत्या; सरकारी कार्यालयात घुसून झाडली गोळी

दहशतवाद्यांचा शोध सुरू
दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असल्याची माहिती काश्मीर पोलिसांनी दिली. दहशतवाद्यांचा शोध सुरु असून अद्याप त्यांना पकडण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले नाही. दहशतवाद्यांनी रियाझ यांच्यावर जवळून गोळीबार केला. यात ते गंभीर झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणासाठी नेमलेले अधिकारी बदलण्याची विनंती फेटाळली

दहशतवाद्यांकडून काश्मीरी पंडिताची हत्या
या घटनेच्या एक दिवस आगोदरच दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून राहुल भट्ट नावाच्या एका काश्मीरी पंडिताची हत्या केल्याची घटना घडली होती. राहुल एक सरकारी कर्मचारी होते आणि दहशतवाद्यांनी सरकारी कार्यालयातच घसून त्यांच्यावर गोळीबार केला होता. हल्ल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Militants shot at and injured a policeman in pulwama dpj