milkman detained after Caught on camera spitting in milk Video: घरोघरी दूध पोहचवणारा एक विक्रेता एका घरी दूध देण्याच्या आधी त्यामध्ये थुंकतानाचा व्हिडीओ घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. हा किळसवाणा प्रकार उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे उजेडात आला. यानंतर पोलिसांनी रविवारी त्या संबंधित दूध विक्रेत्याला ताब्यात घेतले आहे.
ही घटना लखनौच्या गोमती नगर भागात घडली, यामुळे खाद्यपदार्थ हाताळताना स्वच्छता राखण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव मोहम्मद शरिफ असून त्याला पप्पू म्हणून देखील ओळखतात. त्याला त्याच्या विनय खांड आणि लव शुक्ला यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून पहिल्यानंतर ताब्यात घेतले.
या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की कथितपणे शरिफ हा दूध देण्याच्या आधी त्यामध्ये थुंकताना दिसत आहे. यानंतर शुक्ला हे थेट गोमती नगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आणि त्यांनी अधिकृत तक्रार दाखल केली.
“आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेबद्दल त्याची चौकशी केली जात आहे. पुढील कारवाई केली जात आहे,” असे स्टेशन हाऊस ऑफिसर ब्रिजेश तिवारी यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले.
नाम बताता था पप्पू लेकिन असल में यह मो. शरीफ था जो कतई शरीफ नहीं था और लोगों को पप्पू बना रहा था। लखनऊ में थूक ज़िहाद की कहानी सामने आई है। #Milkman #Islam #islamophobie #muslimunity #muslimahhijabi #thookjihad pic.twitter.com/Ectt7Mcg6h
— SANJAY TRIPATHI (@sanjayjourno) July 5, 2025
गेल्या वर्षभरापासून उत्तर प्रदेश राज्यात अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, यानंतर सरकारने याविरोधात कारवाईला सुरूवात केली आहे.
सप्टेंबर महिन्यात सहारणपूर येथे एक किशोरवयीन रोटी बनवत असताना त्यावर कथितपणे थुंकत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता, यामुळे मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात आला होता, यानंतर या दुकानाच्या मालकाला अटक करण्यात आली होती.
गाझियाबाद आणि नोएडा येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका ज्युस विक्रेत्यांना पेयामध्ये युरिन किंवा लाळ मिसळल्याप्रकरणी अटक करण्यात आले होते.
अशा घटना समोर आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अन्नाशी छेडछाड रोखण्यासाठी पावले उचलण्याचे आदेश दिले होते, ज्यामध्ये रेस्टॉरंटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अनिवार्य करण्यात आले. तसेच अन्न हाताळणाऱ्या लोकांसाठी स्वच्छतेचे काटेकोर नियम घालून दण्यात आले. इतकेच नाही तर त्या अस्थापनांच्या मालकस मॅनेजर्स यांचे नाव आणि संपर्क दर्शनी भागात लावण्यचे आदेश देण्यात आले होते.