रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी केंद्र सरकारच्या डेटा प्रायव्हसी आणि क्रिप्टोकरन्सी विधेयकाला पाठिंबा दिला आहे. मुकेश अंबानी यांच्या मते, भारत भविष्यासाठी पुढील धोरणे आणि नियम लागू करत आहे. आपण योग्य मार्गावर आहोत. माझा ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर विश्वास आहे आणि ते क्रिप्टोकरन्सीपेक्षा वेगळे आहे. विश्वास-आधारित  आणि समाजासाठी ब्लॉकचेन खूप महत्वाचे आहे, असे मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंटरनॅशनल फायनान्शिअल सर्व्हिसेस सेंटर अथॉरिटी (आयएफएससीए) द्वारे आयोजित इन्फिनिटी फोरममधील मुलाखतीत त्यांनी याचा उल्लेख केला आहे. मुकेश अंबानी यांचे हे वक्तव्य अशा वेळी आली आहे जेव्हा सरकार छोट्या गुंतवणूकदारांना संरक्षण देण्यासाठी क्रिप्टोकरन्सीबाबत संसदेत नवीन विधेयक मांडण्याच्या मनस्थितीत आहे. सरकारचा खाजगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याचा मानस आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवर क्रिप्टोकरन्सीच्या प्रभावाबाबत रिझर्व्ह बँकेने आधीच सरकारला सतर्क केले आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या मते, ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे क्रिप्टोकरन्सीपेक्षा मजबूत आहे जे चलनाशिवाय अस्तित्वात असू शकते.

मोदी सरकारच्या एका निर्णयाने क्रिप्टोकरन्सी बाजारात खळबळ; सर्व चलनांचे भाव गडगडले, वाचा १० महत्वाचे मुद्दे

“ब्लॉकचेन वापरून, आम्ही जवळजवळ कोणत्याही प्रकारच्या व्यवहारासाठी अभूतपूर्व सुरक्षा, विश्वास, ऑटोमेशन आणि कार्यक्षमता प्रदान करू शकतो,” असे अंबानी म्हणाले. “मला वाटते की स्मार्ट टोकन्स हे सुनिश्चित करत आहेत की तुम्ही असे व्यवहार करत आहात जे कधीही बदलू शकत नाहीत. आपल्या सर्वांसाठी विश्वास आधारित व्यवहार आणि विश्वास आधारित समाजासाठी ही एक अतिशय महत्त्वाची चौकट आहे,” असे अंबानी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सर्वात पुढे जाणारी धोरणे आणि नियम लागू करत आहे, असेही ते म्हणाले.

मुकेश अंबानींच्या मते भारताच्या तांत्रिक परिवर्तनातील दोन प्रमुख मार्गदर्शक तत्त्वे ‘केअरिंग फॉर द प्लॅनेट’ आणि ‘केअरिंग फॉर द पीपल्स’ ही असतील. भारताची मोठी लोकसंख्या आणि ‘जागतिक दर्जाच्या’ डिजिटल पाइपलाइनमधील डेटाच्या बाबतीत अंबानींना दोन मोठे विजय दिसत आहेत. त्यांनी डेटाला न्यू ऑईल म्हणून म्हटले आहे, ज्याचा त्याला विश्वास आहे की डिजिटल-प्रथम जगात मूलभूतपणे भिन्न आहे कारण त्याचे पूर्णपणे लोकशाहीकरण आणि विकेंद्रीकरण केले गेले आहे.

‘आभासी चलनावर सरसकट बंदी नको’ ; संसदीय समितीतील सदस्यांचा कल

देशातील तरुणांबद्दल, अंबानी म्हणाले की, येत्या काही वर्षांत, मी त्यांना जगभरातील उपाय सादर करताना पाहतो, ज्यामुळे जगातील अनेक गुंतागुंतीच्या समस्या सोडवता येतील. लोकांना परवडणाऱ्या हाय-स्पीड डेटा कनेक्टिव्हिटीची उपलब्धता सुनिश्चित करून जिओने या दिशेने पुढाकार घेतल्याचा मला अभिमान असल्याचे अंबानी म्हणाले. “आम्ही ऑप्टिक फायबर, क्लाउड आणि डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चरच्या वेगवान रोलआउटद्वारे समर्थित, अधिक सक्षम करण्यासाठी उपकरणांची तितकीच परवडणारी इकोसिस्टम तयार करण्याच्या प्रक्रियेत आहोत,” असे अंबानी म्हणाले.

ब्लॉकचेन म्हणजे काय?

हे तंत्रज्ञान एक प्लॅटफॉर्म आहे जिथून क्रिप्टोकरन्सीच्या खात्याची हिशोब ठेवता येतो. हे विकेंद्रित लेसर आहे. या नेटवर्कद्वारे क्रिप्टोकरन्सी विकल्या जातात किंवा विकत घेतल्या जातात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mukesh ambani on blockchain technology vital for equitable society abn
First published on: 03-12-2021 at 19:09 IST