लोकसभा निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं आहे. येत्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. अशात आमच्या तिसऱ्या टर्ममध्ये आम्ही खूप मोठे निर्णय देशासाठी घेऊ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. आता त्यांच्याच मंत्रिमंडळातल्या एका नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२९ मध्येही पंतप्रधान म्हणून निवडून येतील असं भाकित वर्तवलं आहे.

नरेंद्र मोदी २०२९ मध्येही पंतप्रधान होतील

“पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींची तिसरी टर्म सुरु होईल. त्याचप्रमाणे चौथ्या टर्ममध्येही म्हणजेच २०२९ लाही मोदीच या देशाचे पंतप्रधान होतील. जनतेचा इतका गहिरा विश्वास आहे तो तुम्हाला जगात कुठल्या नेत्यामध्ये पाहण्यास मिळणार नाही. २०२४ मध्ये भाजपाला ३७० जागा मिळतील आणि एनडीएला ४०० पेक्षा जास्त जागा मिळतील. माझं भाकित चुकत नाही. मी त्या जोरावर सांगतोय तिसरी आणि चौथी टर्म पंतप्रधान नरेंद्र मोदींचीच आहे. ” हे वक्तव्य दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. टीव्ही ९ मराठीच्या कॉनक्लेव्हमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

हे पण वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशाला रेल्वेच्या ४१ हजार कोटींच्या दोन हजार हून अधिक प्रकल्पांचं गिफ्ट, महाराष्ट्राला काय मिळालं?

आर्थिक आघाडीवर देशात चमत्कार

देशात करिश्मा झाला आहे. आर्थिक आघाडीवर चमत्कार झाला आहे. लोकांचा मोदींवर भरोसा आहे. आर्थिक क्षेत्रात ज्या प्रकारे काम झालं आहे, ते जबरदस्त आहे. कोरोनाच्या काळात आपली अर्थव्यस्था सांभाळणं ही छोटी गोष्ट नव्हती. आमच्या अर्थव्यवस्थेची प्रगती खूप चांगल्या प्रकारे होते आहे. जगातील कोणत्याच देशाच्या अर्थव्यवस्थेचा इतका झपाट्याने ‘ग्रोथ रेट’ वाढलेला नाही. जगातील सर्वात फास्टेट ग्रोईंग इकोनॉमी भारताची आहे. आत आपण चार ट्रिलियन इकॉनॉमी झाला आहोत. मी म्हणत नाही, तर मॉर्गन स्टॅनली म्हणत आहे. भारताला टॉप थ्री इकॉनॉमी आणण्यासाठी कोणी रोखू शकत नाहीत. फायनान्शिअल फर्मच सांगत आहे, असंही त्यांनी सांगितलं.