भारतीय रेल्वे खात्यासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ४१ हजार कोटींच्या प्रकल्पांची घोषणा केली. दोन हजारांहून जास्त प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी एकट्या रेल्वेखात्यासाठी घेऊन आले आहेत. अमृत भारत स्टेशन योजनेतंर्गत ५५३ स्टेशन्सची पुनर्बांधणी केली जाणार आहे. तसंच हे सगळे प्रकल्प आणि देशाला समर्पित करतो आहोत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या निर्णयामुळे देशातल्या २७ राज्यांमधल्या ५५३ रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याविषयी त्यांच्या X अकाऊंटवरुनही माहिती दिली आहे.

हे पण वाचा- पंतप्रधान मोदींकडून जम्मू-काश्मीरमधील जगातील सर्वात उंच रेल्वे प्रकल्पाला हिरवा कंदील; मार्ग, आव्हाने अन् फायदे जाणून घ्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन प्रेस कॉन्फरन्स घेत विविध प्रकल्प आणि योजनांचं उद्घाटन केलं. यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्रीही उपस्थित होती. आपण पहिल्यांदाच २ हजार योजना एकाचवेळी सुरु करत आहोत. रेल्वेच्या पायाभूत बदलांमध्ये महत्त्वाच्या बदलांची सुरुवात करण्याचा हा दिवस आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

कुठल्या राज्यांच्या स्थानकांची पुनर्बांधणी होणार?

महाराष्ट्र – ५६ रेल्वे स्थानकं
गुजरात – ४६ स्थानकं
आंध्रप्रदेश – ४६ स्थानकं
तामिळनाडू- ३४ स्थानकं
बिहार – ३३ स्थानकं
मध्य प्रदेश- ३३ स्थानकं
कर्नाटक- ३१ स्थानकं
झारखंड- २७ स्थानकं
छत्तीसगड- २१ स्थानकं
ओदिशा- २१ स्थानकं
राजस्थान- २१ स्थानकं

याशिवाय १५०० ओव्हरब्रिज, अंडरपास यांचंही भूमिपूजन करण्यात आलं. उत्तर प्रदेशात २५२, महाराष्ट्रात १७५, मध्यप्रदेशात १३३, गुजरात १२८, तामिळनाडूत ११५, राजस्थानात १०६, छत्तीसगड ९० आणि झारखंडमध्ये ८३ प्रकल्पांचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्राला काय मिळालं? श्रीकांत शिंदेंनी दिली माहिती

अमृत भारत योजनेच्या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशासाठी ५५४ रेल्वे स्टेशन्सचा विकास होणार आहे. एकट्या महाराष्ट्रासाठी १५ हजार ५४० कोटींचं बजेट ठेवण्यात आलं आहे. यामुळे रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे. दिवा, मुंब्रा, शहाड यासाठीही निधी देण्यात आला आहे. दिवा-सीएसटी ही लोकल सुरु करण्याचीही मागणी होते आहे. त्यासाठी आम्ही पाठपुरावा करतो आहोत असंही श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.